लोकसभा निवडणूकः रायगडबद्दल थोडंसं

0
901
रायगड जिल्हा दोन लोकसभा मतदार संघात विभागला गेला आहे.रायगड लोकसभा मतदार संघात पेण,अलिबाग,श्रीवर्धन ,महाड हे रायगडमधील चार विधानसभा मतदार संघ आणि दापोली आणि गुहागर हे रत्नागिरी मधील दोन विधानसभा मतदार संघ समाविष्ट झाले आहेत.मावळ लोकसभा मतदार संघात रायगडमधील पनवेल,कर्जत,उरण हे तीन विधानसभा मतदार संघ आणि पुणे जिल्हयातील पिंपरी-चिंचवड,मावळ हे मतदार संघ समाविष्ट केले गेलेले आहेत.
रायगड जिल्हयात 18 लाख 70  हजार 637  मतदार आहेत.2009च्या तुलनेत 1लाख59हजार627 नव्या मतदारांची भर पडलेली आहे.. यातील 10 लाख 38 हजार 346 मतदार रायगडचा खासदार निवडतील तर 8लाख 32 हजार 291 मतदार मावळचय खासदारासाठी मतदान करतील.  रायगड जिल्हयात एकूम 2366 मतदान केंद्रे असतील
रायगड लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे अऩंत गीते हे 2009मध्ये विजयी झाले होते.त्यांनी कॉग्रेसचे बॅरिस्टर अ.र.अंतुले यांचा 1लाख 46 हजार 521 मतांनी पराभव केला होता.मावळ मतदार संघही शिवसेनेच्याच ताब्यात आहे.तेथे गजानन बाबर यांनी गेल्या वेळेस राष्ट्रवादीचे आझम पानसरे यांचा 80616 मतांनी पराभव केला होता.यावेळी देखील दोन्ही मतदार संघात शिवसेना विरूध्द राष्ट्रवादी अशी लढत होईल अशी शक्यता आहे.रायगड मतदार संघासाठी शिवसेनेने अनंत गीते यांची उमेदवारी जाहीर केली असली तरी हा मतदार संघ कॉग्रेसने लढवायचाय की,राष्ट्रवादीने हे अजून ठरलेले नाही.मतदार संघ राष्ट्रवादीकडे आल्यास तेथून सुनील तटकरे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.मावळमध्ये अजून शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपले पत्ते उघड केलेले नाहीत.गेल्या वेळेस युती बरोबर असलेला शेतकरी कामगार पक्ष यावेळेस कोणाबरोबर असेल हे ही अजून स्पष्ट झालेले नाही.शेकाप आम आदमी पार्टीच्या उमेदवाराला मदत करतो की,आपची मदत घेऊन स्वतःचा उमेदवार उभा करतो हे ही अजून स्पष्ट व्हायचे आहे.
रायगड  आणि मावळ लोकसभेची निवडणूक प्राधान्याने प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांवर लढविली जाणार आहे.रायगडात नवी मुंबई विमानतळामुळे होणाऱ्या विस्थापनाचा प्रश्न उग्र आहे.माणगाव,तळा,रोहा तालुक्यात दिल्ली मुंबई इंन्डस्ट्रीयल कॉरिडोरचा मुद्दाही मतदानाचा महत्वाचा मुद्दा ठऱणार आहे.तसेच कोकणातून रेल्वे जाते पण रायगडला त्याचा फायदाच होत नाही याविरोधात बुधवारी माणगावमध्ये रेल्वे रोको आहे,तो प्रश्नही महत्वाचा आहे.मुंबई-गोवा महामार्गाचे रूंदीकरण पहिल्या टप्प्यात इंदापूरपर्यतच होत आहे.रूंदीकऱणापासून महाड खेड आणि रत्नागिरी जिल्हा वंचित आङे.तो ही प्रचाराचा महत्वाचा मुद्दा ठरणार आहे.याचबरोबर दरवर्षी जाणवणारी पाणी टंचाई आणि दोन्ही कडच्या विद्यमान खासदारांच्या लोकसभेतील कामगिरीचे मुद्देही अग्रक्रमाने प्रचाराचे मुद्दे केले जाण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here