लाईव्ह कार्यक्रमात पत्रकारावर गोळीबार

0
1035

27 ऑगस्ट : अमेरिकेत व्हर्जिनिया प्रांतामध्ये स्थानिक टीव्ही चॅनेलचा लाईव्ह कार्यक्रम सुरू असताना ऍलिसन पार्कर ही रिपोर्टर आणि व्हिडिओ जर्नालिस्ट ऍडम वॉर्डवर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेनं संपूर्ण अमेरिकेला धक्का बसलाय. धक्कादायक म्हणजे हल्लेखोर ब्रायस विलियम्स हा हल्लेखोर याच चॅनेलचा माजी कर्मचारी होता. नंतर त्यानं स्वतःवरही गोळ्या झाडून घेतल्या.

ऍलिसन पार्कर ही सकाळच्या कार्यक्रमासाठी लाईव्ह इंटरव्ह्यू करत होती. एका महिलेशी ती संवाद साधत होती. लाईव्ह बातचीत सुरू असताना अचानक ब्रायस विलियम्स  तिथे आला आणि त्याने ऍलिसन पार्कर आणि व्हिडिओ जर्नालिस्ट ऍडम वार्डवर गोळ्या झाडल्यात.गोळीबार केल्यानंतर हा हल्लेखोर तिथून पसार झाला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडलं खरं पण त्याने स्वता:वर गोळ्या झाडून घेतल्या. या हल्लेखोराने हल्ल्याचं चित्रीकरण केलं आणि नंतर तो व्हिडिओ स्वतःच्या फेसबुक पेजवर अपलोडही केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here