पेण अर्बन बॅंक घोटाळ्यातील एक मुख्य आरोपी आणि रिझर्व्ह बॅकेचा वरिष्ठ अधिकारी अब्दुल बरी खान याला पेण पोलिसांनी काल उशिरा अटक करून त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयाने 22 ऑगस्टपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पेण अर्बन बॅकेचे ऑडीट अब्दुल बरी खान याच्याच मार्गदर्शनाखाली होत असे. 206-07 आणि 2007-08 या काळात खानने बॅेकचे लेखा परिक्षण केले होते.मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून त्याने खोटे ऑडीट रिपोर्ट तयार करून त्याने पेण अर्बन बॅकेला अ वर्ग प्रमाणपत्र दिले होते.रिझर्व्ह बॅकेच्या या प्रमाणपत्रावर विश्वास ठेऊन जिल्हयातील जनतेनं मोठ्या प्रमाणात ठेवी बॅकेत ठेवल्या होत्या.रिझर्व्ह बॅकेचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी एक कोटी रूपये दिले गेले असल्याचे तपासत स्पष्ट झाले आहे.128 बोगस कर्ज प्रकऱणे आणि त्यात 758 कोटींचा घोटाळा झालेला असतानाही पेण बॅकेला अ वर्ग दर्जा दिला गेला होता.बॅकेतला घोटाळा उघड झाल्यापासून खान फरार होता.त्याला अटक न झाल्यास आंदोलन कऱण्याचा इशाराही ठेवीदारांनी दिला होता