रायगड वार्तापत्र

0
1020

रायगडची हवा सध्या थंड आणि आल्हाददायक असली तरी 17 आणि 18 तारखेला अलिबागेत झालेल्या राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिराने रायगडमधील राजकीय हवा बऱ्यापैकी तापली होती.चिंतन शिबाराच्या उदयघाटनाच्या भाषणात पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्रातील फडणवीस सरकार टिकविण्याचा मक्ता आम्ही घेतला नाही असे विधान करून राज्यभर सणसणाटी निर्माण केली होती.पवारांच्या या वक्तव्यावर राज्यभर उलट-सुलट प्रतिक्रिया उमटल्या आणि माध्यमातूनही राष्ट्रवादीवर जोरदार टीका झाली.त्यानंतर समारोपाच्या भाषणात शरद पवार यांनी आपल्या सावरासावर करीत आम्ही काही लगेच सरकार पाडणार नाही,माझ्या वक्तव्याचा अ र्थ माध्यमांनी चुकीचा लावला,आम्ही सभागृहात समर्थ विरोधी पक्षाची भूमिका पार पाडू आणि सरकार जर जनहितविरोधी भूमिका घेत असले तर रस्तयावर आणि सभागृहात त्याच्या विरोधात आवाज उठवू असे स्पष्ट केले.असे असले तरी पवारांच्या वक्तव्याचा जो संकेत भाजपला मिळायला हवा होता तो मिळाली आणि राज्यात भाजप आणि शिवसेना युतीच्या दृष्टीनं नव्यानं प्रय़त्न सुरू झाले.मुळात शरद पवारांनी असे वक्तव्य का केले असावे,पवारांना सरकारवर दबाव आणायचा होता,महाराष्ट्रतील जनतेचे लक्ष चिंतन शिबिराकडे वेधायचे होते की,मध्यावधी निवडणुकांचे संकेत देऊन कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ झटकायची होती यावर नंतर दोन-चार दिवस महाराष्ट्रात र्चाा सुरू राहिली.शरद पवारांच्या वक्तव्याने साऱ्याचे लक्ष अलिबागकडे वेधले गेले असले तरी याच शिबिरात पक्षातील अंतर्विरोधही उघडपणे समोर आले.राष्ट्रवादीने भाजपला पाठिंबा देण्याची पक्षाची भूमिका पक्षातीलच अनेक प्रमुख नेत्यांना मान्य नाही.ती प्रथमच अलिबागेत बोलून दाखविली गेली.माजी मंत्री जयंत पाटील यांनी तर जाहीरपणे पक्षाने भाजपला पाठिंबा द्यायला नको होता असे मत व्यक्त केले आहे.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रायगडमध्ये राष्ट्रवादीचे दोन आमदार निवडुन आले असले तरी अन्य पाच मत दार ंसंघात पक्षाच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे,तसेच मतांच्याबाबतीत पक्ष पाचव्या स्थानावर गेला आहे.या पार्श्वभूमीवर चिंतन शिबिर रायगडमधील पक्षात नवचैतन्य आणण्यात कितपत यशस्वी ठरते ते आता बघायचे आहे.

कोकणात दोन मोठे प्रकल्प येणार

कोकणातील औद्योगिक वसाहतींची अवस्था रया गेल्यासारखीच झाली आहे.बहुतेक औद्योगिक वसाहतीतील 75 टक्क्याच्यावर कारखाने बंद असल्याने या औद्योगिक वसाहती म्हणजे सांगडे झाल्या आहेत.या पार्श्वभूमीवर केर्दीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी कोकणातील जनतेला दिलासा देणारी बातमी नुकतीच अलिबागेत दिली.रायगड जिल्हयातील रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक पट्‌ट्यात आणि रत्नागिरी जिल्हयातील लोटे परशूराम औद्योगिक परिसरात दोन मोठे प्रकल्प येत असल्याची ती बातमी आहे.लोटे परशूराम येथे हिंदुस्थान पेपर कार्पोरेशनचा कागद निर्मिती प्रकल्प लोटे परशूराम येथे आणला जाणार आहे.त्यासाटी 2400 रूपयांची गंतवणूक अपेक्षित आहे.या प्रकल्पासाठी एमआयडीसीत जागा उपलब्ध असल्याने नव्याने भूसंपादन करण्यात येणार नाही.रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक परिसरात भारत हेवी इलेक्ट्रीक कंपनीचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.त्याासाठी भूसंपादन करावे लागणार असल्याची माहिती गीते यांनी दिली.हे दोन्ही प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर कोकणातील 10 हजार बेरोजगार तरूणांना रोजगार मिळणार आहे.शिवाय मृतावस्थेत गेलेल्या एमआयडीसीला नव्याने संजीवनी मिळणार आहे.

पेण – अलिबाग रेल्वेचा प्रश्नही मार्गी लागणार

अनंत गीते यांनी अलिबागकरांना आणखी एक सुखद धक्का देणारी बातमी सांगितली.कोकण रेल्वे पेणहून जाते.पेण ते आरएसएफ अशी मालवाहतुकीसाठी देखील एक रेल्वे लाईन आहे.या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करावी आणि अलिबाग रेल्वेने मुंबईला जोडावे अशी अलिबागकरांची जुनी मागणी आहे.हा मार्ग मंजूर देखील झाला पण घोडे पुढे हालत नव्हते.हा विषय आता आपण मार्गी लावणार असून येत्या पंधरा दिवसात केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची आपण भेट घेऊन त्याबाबत चर्चा कऱणार असल्याचे गीते यांनी सागिंतले.रेल्वे मंत्री कोकणातील असल्याने कोकणातील रेल्वे प्रकल्प आता मार्गी लागतील अशी आशाही त्यांंंंनी व्यक्त केली.

मुंबई-गोवा महमार्ग प्रकल्पग्रस्तांचे उपोषण

– रायगड जिल्हयात येत असलेल्या प्रकल्पामधील बाधित नागरिकांच्या पुनर्वसनाच्याबाबतीत सरकारचे काही निश्चित धोरण नाही.विविध प्रकल्पांच्या बाबतीत वेगवेगळे निकष लावून त्यांना पुनर्वसन पॅकेज दिले जातात.नवी मुंबई विमानतळ बाधितांना जे पॅकेज दिले ते दि घी पोर्टच्या किंवा अन्य प्रकल्पातील बाधितांना मिळत नाही.त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये मोठी नाराजी असते.ते मग रस्त्यावर उतरून आपली नाराजी व्यक्त करतात.मुंबई-गोवा महार्गाच्या रूंदीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम सध्या जोरात सुरू आहे.पळस्पे ते इंदापूर या 84 किलो मीटरच्या मार्गाच्या रूंदीकरणामुळे अनेक नागरिकांची शेती आणि घरे रूंदीकरणात जात आहेत.मात्र त्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळत नस्लयाची प्रकल्पग्रस्तांची तक्रार आहे.या संदर्भात प्रकल्पग्रस्तांनी वारंवार जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आपली कैफियत बोलून दाखविली मात्र आपल्याला न्याय मिळत नसल्याची प्रकल्पग्रस्तांची तक्रार आहे.त्यामुळेच ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनानी आणि सामाजिक कार्यकर्ते जी.जी.पारीख आणि संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली 21 नोव्हेबर रोजी प्रकल्पग्रस्तांनी पेण येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले.मात्र प्रांताधिकारी नि धी चौधरी यांनी प्रकल्पग्रस्ताची भेट घेऊन तुमचे गाऱ्हाणे आपण वरिष्टापर्यत पोहचू असे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण स्थगित ठेवण्यात आले.सातत्यानं गेली दोन वर्षे लढणाऱ्या या प्रकल्पग्रस्तांना आता न्याय मिळतो की नाही ते आता पहायचे.

रायगडमध्ये स्वच्छता मोहिम बनली लोकचळवळ
——————————–
महाराष्ट्र सरकारचे स्वच्छतादूत डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्ररणेने आणि मार्गदर्शनाखाली डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने 16 नोव्हेंबररोजी रायगडसह राज्याच्या 77 शहरात एकाच दिवशी स्वच्छता अभियान राबविण्यात आले.त्यामध्ये जवळपास दीड लाख श्रीसदस्यांनी सहभाग नोंदविला होता.रायगडमध्ये या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्या हस्ते कऱण्यात आला.यावेळी त्यांनी डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रथिष्टानच्या लोकोपयोगी कार्यांची प्रशंसाकरून स्वच्छतेच्या बाबतीत रायगड जिल्हा राज्यात पहिला आला पाहिजे अशी आशा व्यक्त केली.या मोहिमेत रायगडमधील महसूल कर्मचारी देखील मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.त्या अगोदर जिल्हाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली रायगड किल्ल्लयावरही सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहिम पार पाडली.जिल्हयातील इतर शासक ीय,निमशासकीय संस्था,स्वयंसेवी संस्थाच्यावतीनेही ठिकठिकाणी स्वच्छता मोहिमी आखल्या गेल्या किंवा आखल्या जात असल्याने स्वच्छता अभियान रायगडमध्ये एक लोकचळवळ बनले आहे.

– शोभना देशमुख–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here