रायगड प्रेस क्लबचा बारावा वर्धापन दिन काल 24 मार्च रोजी खोपोली येथे संपन्न झाला.या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत,ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी,आदेश बांदेकर,एस.एम.देशमुख उपस्थित होते.या कार्यक्रमात आयबीएन-लोकमतचे संपादक मंदार फणसे यांना राज्यस्तरीय आदर्श संपादक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.जिल्हयातील अन्य पाच पत्रकारांनाही पुरस्कार देऊन सन्मानित कऱण्यात आलं.यावेळी लेखणी या स्मरणिकेचं प्रकाशनही करण्यात आलं.
भारतकुमार राऊत,विश्वंभर चौधरी,आदेश बांदेकर यांची भाषणं नेहमीप्रमाणं खुमासदार तेवढीच विचार करायला लावणारी होती.त्यांच्या भाषणातून रायगडमधील पत्रकारांना एक चागली वैचारिक मेजवाणीच मिळाली.
संतोष पेरणे हे पुढील दोन वर्षासाठी रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष झालेत.मावळते अध्यक्ष विजय पवार यांच्याकडून त्यांनी यावेळी सूत्रे स्वीकारली.कार्यक्रमास मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक,सरचिटणीस संतोष पवार,विभागीय चिटणीस मिलिंद अष्टीवकर,पुणे जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष बापूसाहेब गोरे यांच्यासह रायगडमधील तीनशेवर पत्रकार उपस्थित हो