रायगड प्रेस क्लबः अध्यक्षपदी मोकल

0
818

रायगड प्रेस क्लब
बिनविरोध निवडीची परंपरा कायम

अभय आपटे .संतोष पवार ,मिलिंद अष्टीवकर ,किरण बाथम , विजय पवार ,संतोष पेरणे आणि आता विजय मोकल … हि नावे आहेत रायगड प्रेस क्लब च्या बिनविरोध अध्यक्षांची . एक तपा पूर्वी एस एम देशमुख यांनी रायगड प्रेस क्लब नावाची लढाऊ संघटना निर्माण केली . सामाजिक प्रश्नांची जाण आणि भान ठेऊन पत्रकारिता करणाऱ्या सर्व पत्रकार सहकाऱ्यांनी या संघटनेचे काम एस एम देशमुख यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीने पुढे नेले . रायगड प्रेस क्लब म्हणजे एक कुटुंब झाले आहे . आज रायगड प्रेस क्लबच्या २०१७ – २०१९ साठी नवीन कार्यकारिणी निवडण्यासाठी कर्जत येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते .मिलिंद अष्टीवकर अभय आपटे विद्यमान अध्यक्ष संतोष पेरणे यांच्यासह अनेक सभासद पदाधिकारी यावेळी उपस्थित होते . एकूणच कामकाजाची दिशा आणि सर्वसमावेशकता यावर चर्चा झाली . काही धोरणात्मक बदल आज मान्य करण्यात आले . सर्वात महत्वाचे म्हणजे जे ठरले ते एकमताने आणि सर्व संमतीने ठरले . रायगड प्रेस क्लब चे पुढील अध्यक्ष म्हणून लढाऊ बाण्याचे पेण येथील विजय मोकल यांची निवड करण्यात आली . कर्जत मधून धर्मानंद गायकवाड उपाध्यक्ष ,संजय मोहिते जिल्हा संघटक ,दरवेश पालकर सह सचिव आणि अनिल गवळे दत्ता शिंदे यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड झाली . या पाच जणांचे तसेच नवनिर्वाचित कार्यकारिणीचे मनपूर्वक अभिनंदन मनपूर्वक अभिनंदन

-माजी अध्यक्षांची सुकाणू समिती स्थापन
-माजी अध्यक्षांशिवाय भाई जगन्नाथ ओव्हाळ ,विजय कडू ,दीपक शिंदे आणि नागेश कुलकर्णी -यांचा यासमिती मध्ये समावेश
-या पुढील निवडणूक ऑनलाईन पद्धतीने मतदान करून होणार .
-सर्व पदासाठी होणार निवडणूक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here