रायगड पोलिसांची जय्यत तयारी

0
652

रायगड पोलिसांची जय्यत तयारी

मुंबई-गोवा महामार्गावर गणेशोत्सव काळात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी रायगड पोलिसांनी जय्यत तयारी केली असून खारपाडा ते कशेडी दरम्यान सोळा ठिकाणी 50 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.तसेच हमरापूर फाटा,कांदळेपाडा,वाकणफाटा आणि नाते खिंड अशा चार ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन केंद्रे उभारण्यात येत असून या ठिकाणी चार रूग्णवाहिका तयार ठेवण्यात येणार आहेत.माणगाव,नागोठणे,वडखळ आणि रामवाडी या बसस्थानकामुळे वाहतूक कोंडी होऊ शकते हे लक्षात घेऊन लांब पल्ल्यांच्या गाडयांना या स्थानकात प्रवेश कऱण्यास प्रतिबंध घातला जात आहे.त्याऐवजी तात्पुरती पर्यायी थांबे उभारण्यात येत आहेत.जड वाहनांनाही प्रवेश बंद केला जात आहे.पाच ठिकाणी विशेष सहाय्यता केंद्रे उभारली जात आहेत.वडखळ,माणगाव,कोलाड ही हमखास वाहतूक कोंडीची ठिकाणं आहेत हे लक्षात घेऊन तेथे ओव्हरटेकिंग करता येऊ नये यासाठी रस्त्यामध्ये दुभाजक उभारले जात आहेत.तसेच चोरीच्या घटना टाळण्यासाठी देखील रायगड पोलिसांनी विशेष काळजी घेतली आहे.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here