रायगड जिल्हयातील नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले आहे.ून त्यानुसार माणगाव नगरपंयायतीत नगराध्यक्ष खुल्या प्रवर्गातला असेल.तळा,गोरेगाव,पोलादपूर आणि खालापूर या चार नगरपंचायतीचे नगराध्यक्ष महिलांचा खुला प्रवर्ग यासाठी राखीव असणार आहेत तर म्हसळ्यात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव असणार आहे.त्यामुळे सहा नगरपंचायतीपैकी किमान चार नगरपंचायतीत महिला राज येणार हे आता स्पष्ट झालं आहे.–