रायगड जिल्हा परिषदेचा 61 कोटींचा अर्थसंकल्प मंजूर

0
807

रायगड जिल्हा परिषदेच्या 60 कोटी 75 लाख रूपयांच्या अर्थसंकल्पात बांधकामासाठी 10 कोटी,अंगणवाडयांसाठी 3 कोटी,मागासवर्गीय योजनांसाठी 9 कोटी,तर स्मारके,समाजमंदिरांसाठी 3 कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.

रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ आणि बॉंधकाम सभापती उत्तम कोळंबे यांनी काल 2014-15चा अर्थसंकल्प मांडला.अलिबाग येथील ना.ना.पाटील सभागृहात झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष कविता गायकवाड होत्या
अर्थसंकल्पात शेती,कृषी ,महिला बालकल्याण आणि शिक्षणसाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे,रायगड भूषण पुरस्कारांसाठी 2 लाख 20 हजारा,शिक्षणसाठी 1कोटी 43 लाख 20 हजार,बांधकामासाठी 9 कोटी,57 लाख 75 हजार,पाटबंधारे विभागासाठी 1 कोटी 55 लाख,आरोग्या विभागासाठी 1कोटी28 लाख,कृषी विभागासाठी 2 कोटी 20 लाख समाजकल्याणसाठी 10कोटी33लाख 20 हजार रूपये,अपंग कल्याणासाठी 1 कोटी 4 लाख रूपयांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे.विरोधी पक्षांनीही या अर्थसंकल्पाचे स्वागत करीत काही सूचना केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here