रायगड जिल्हयात दोन दिवसात दोन पत्रकारांवर हल्ले

0
793

रायगड जिल्हयात गेल्या दोन दिवसात दोन पत्रकारांवर हल्ले झाले.पहिली घटना अलिबाग येथे घडली.अलिबाग येथील पुढारीचे फोटोग्राफर-पत्रकार रमेश कांबळे यांना राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली.अलिबाग येथे झालेल्या एका कार्यक्रमाच्या वार्तांकनाच्या संदर्भात महिला आघाडीचा काही आक्षेप होता.त्यासंदर्भात त्यांनी पुढारीच्या संपादकांची मुंबई येथे जाऊन भेटही घेतली होती.त्यानंतर पुढारीत खुलासाही छापला गेला होता.असे असतानाही कांबळे यांना पोलिस स्टेशनसमोरच मारहाण केली गेली.आज अलिबाग येथे झालेल्या प्रेस क्लबच्या बैठकीत या घटनेचा निषेध कऱण्यात आला.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा निमत्रक दीपक शिंदे यांनी आज अलिबाग येथे पत्रकारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.

दुसरी घटना खोपोलीत काही वेळा पुर्वी घडली.खोपोली येथील साप्ताहिक समाज वैभवचे संपादक गोकुळदास येशीकर यानी आपल्या साप्तहिकात शीळगाव येथे माजी उपनगराध्यक्षांसह त्यांच्या भावंडानाही चोपले,पेढेही वाटले अशा मथळ्याखाली बातमी छापली होती.त्यामुळे संतापलेल्या स्थानिक पुढारी इब्रहिम पाटील यांचे बंधू आयुब पाटील यांनी आज येशीकर यांना बेदम मारहाण केली.गंमत अशी की,माझ्या जिवाला धोका आहे अशी तक्रार येशीकर यांनी 14 तारखेला खोपोली पोलिसात दाखल केली होती.त्याची एनसी देखील दाखल झाली होती.मात्र पोलिसांनी कोमतीच कारवाी केली नसल्याने आज हा हल्ला झाला.रायगड जिल्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या हल्ल्याचा निषेध केला असून आरोपीवर कारवाई कऱण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here