श्रीवर्धन तालुक्यातील ज्या शेखाडी येथे 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील स्फोटकं उतरविण्यात आली होती त्याच शेखाडीच्या परिसरात तसेच अलिबाग तालुक्यातील काशिद आणि बोर्लीच्या समुद्रात बेवारस अवस्थेत 21 पिंप सापडल्यानंतर पोलिस यंत्रणा सतर्क झाली असून किनार्यावर हायअॅलर्ट देण्यात आले आहे. पिंपामध्ये हिरव्या रंगाचे ज्वालाग्राही द्रव्य आढळून आले असून हे द्रव्य नेमके कोणते आहे हे तपासणीसाठी कलिना येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.ही पिंप नेमकी कोटून आली याचा शोधही भारतीय तटरक्षक दल,बंदर विभाग घेत आहेत.काही दिवसांपुर्वी एक जहाज समुद्रात बुडाले होते त्यातील ही पिंप आहेत का याचाही शोध घेतला गेला आहे.मागच्या आठवडयात अलिबागच्या समुद्रावर काळ्या तेलाचे तवंग आढळून आले होते.त्याच्याशी या पिंपाचा काही संबंध आहे काय याचाही शोध घेतला जात आहे.आणखी काही पिंप समुद्रात असण्याच्या शक्यतेचा पोलिस इन्कार करीत नाही.आज सकाळपर्यत 13 टाक्या रेवदंडा पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून त्या बोर्ली दूरक्षेत्र येथे ठेवण्यात आल्या आहेत.-