रायगड आणि इंदापुरात बिनविरोध निवडणुका

0
771

मराठी पत्रकार परिषदेचा कारभार लोकशाही पध्दतीनं पार पाडण्याचा प्रयत्न होतोय,त्याचाच एक भाग म्हणून ठरलेल्या कालावधीत निवडणुका घेतल्या जाव्यात असा आग्रह धरला जात आहे.रायगड प्रेस क्लबच्या विद्यमान कार्यकारिणीची मुदत मार्चमध्ये ंसपत असतानाच तेथील पदाधिकार्‍यानी आज निवडणूक प्रक्रिया पार पाडली.पेणेचे विजय मोकल यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.इतर पदाधिकारी देखील बिनविरोध निवडले गेले.सर्वांचे अभिनंदन.
पुणे जिल्हयातही परिषदेच्या कार्याची व्याप्ती वाढत आहे.गेली चार वर्षे बंद पडलेले इंदापूर तालुका पत्रकार संघाची नव्याने सदस्य नोंदणी करून तेथे ऑनलाईन पध्दतीनं निवडणूक घेण्याचे ठरले.त्यानुसार आज निवडणूक प्रक्रिया पार पडली.मात्र नऊ जागांसाठी तेवढेच अर्ज आल्यानं निवडणूक बिनविरोध झाली.महादेव पाठक अध्यक्ष आणि अन्य पदाधिकारी निवडले गेले.सर्वांचे मनःपूर्व अभिनंदन.-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here