रायगडात सागरी सुरक्षा कवच मोहिेम 

0
1032
अलिबाग- मुंबईवर 26/11 रोजी सागरीमार्गे झालेल्या हल्ल्याची पुनरावृत्ती होऊ नये  याची दक्षता घेण्यासाठी  कोकण किनारपट्टीवर काल पासून “सागरी सुरक्षा कवच मोहिमे”ची सुरूवात करण्यात आली आङे. या मोहिमेचा भाग म्हणून संपूर्ण रायगड जिल्हयात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.या मोहिमेत 1हजार 116 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सहभागी करण्यात आले आहे… जिल्हयातील नाक्या नाक्यावर कडक तपासणी केली जात आहे.समुद्र मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावरही म्हणजे उरण मधील मोरा बंदर,अलिबागमधील मांडवा,रेवस बंदरात देखील कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे.येणाऱ्या -जाणाऱ्यांची तेथे कसून तपासणी केली जात आहे. पोलिसांचे हे कवच भेदण्यासाठी रेड टीमही तयार केली गेली असून रेड टीमला कोठेही घुसखोरी करता येऊ नये यासाठी चोख व्यवस्था कऱण्यात आली आहे.या मोहिमेत हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे आज संध्याकाळपर्यत ही मोहिम सुरू राहणार असल्याचे रायगड पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here