रायगडात सरासरी दररोज चार अपघात 

0
968

रायगड जिल्हयातून जाणारा मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाकडे होणारे दुर्लक्ष आणि एकूणच जिल्हयातील रस्त्यांची झालेल्या दुरवस्थेची किती मोठी किंमत लोकांना मोजावी लागत आहे ते आज सकाळने दिलेल्या बातमीवरून दिसते.रायगडमध्ये गेल्या तीन -चार वर्षात रस्ता अपघातांचे प्रमाण चिंता वाटावी एवढे वाढले आहे.जिल्हयात जानेवारी ते सप्टेंबर 2016 या नऊ महिन्यात 913 अपघात झाले.(म्हणजे प्रत्येक महिन्याला किमान शंभर अपघात.)यामध्ये 253 निष्पाप लोकांचे बळी गेले तर 663 जण जखमी होऊन कायमचे जायबंदी झाले.त्याच्या अगोदरच्या वर्षात म्हणजे 2015मध्ये 1262 अपघात झाले होते त्यात 255 जणांचे बळी गेले होते.म्हणजे यंदा गत वर्षीच्या तुलनेत अपघात कमी झालेले दिसत असले तरी मृत्युमुखी पडणाऱांची संख्या मात्र वाढली आहे.2014 मध्ये 1423 अपघात झाले होते,त्यात 357 जणांना प्राणास मुकावे लागले होते.मुंबई-गोवा या महामार्गावरच जास्तीत जास्त अपघात झाले आहेत.रस्त्याच्या चौपदीरकऱणाचे अनेकदा वादे केले गेले त्याचे वांधे झाल्याचे दिसते.आता 2018 चा नवा वादा असला तरी तोपर्यंत मुंबई-गोवा चौपदरी होण्याची सुतराम शक्यता नाही.रस्ता चौपदरी होत नाही त्यातच जिल्हयात मुंबई-दिल्ली इन्डस्ट्रीयल कॉरिडोर,दिघी पोर्ट ,नवी मुंबई विमानतळासारखे नवे प्रकल्प येत असल्याने मोठ्या वाहनांची वर्दळ वाढली आहे.त्यातच रेती माफियांच्या सुसाट धावणार्‍या ट्रक्स देखील अपघांतांचे कारण ठरत आहेत.गेली चार मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकऱणाच्या नावाखाली लागलेली वाट,धोकादायक बायपास,अवघड वळणं,रस्त्यावर पडलेले खड्डे,अरूंद रस्ते ही सगळी कारणं आहेत अपघात वाढण्याची.त्याची चिंता कोणाला नाही.पत्रकारांनी सततच्या केलेल्या पाठपुराव्यामुळे काम सुरू झालं पण ते पूर्ण होताना दिसत नाही.त्यामुळं रस्त्यावरून जाताना जीव मुठीतच घेऊन जावे लागते.अपघातात सापडलेले बहुसंख्य स्थानिक नागरिकच असतात असं असतानाही स्थानिक पुढार्‍यांना याची फिकीर नाही हे अधिक चिंताजनक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here