रायगडात पावसाची दांडी

0
1003

महाराष्ट्रात मान्सून दाखल झाल्याचे हवामान खात्यानं जाहिर क ेलं असलं तरी रायगडमध्ये अजूनही पावसाळा सुरू झाल्याचं चित्र दिसत नाही.मध्यंतरी दोन दिवस पावसानं हजेरी लावली खरी पण त्या पावसात जोर नव्हता.आता तर गेल्या चार दिवसांपासून पावसानं दांडी मारली अशून उन्हाळ्यासारखं कडक उन पडू लागल्यानं त्याचा भातपिकांच्या रोपांवर परिणाम होत आहे. झालेल्या पावसाचं पाणी खाचरात साचलेलं नसल्यानं रोपं कोमेजू लागली आङेत.त्यामुळं शेतकरी काळजीत आहेत.रायगड जिल्हयात 1 जून ते 19 जून या कालावधीत अबघा 126 मिली मिटरच पाऊस झाला आहे.रोहिण्या पाठोपाठ मृग नक्षत्रातही पावसानं हुलकावणी दिल्यानं खरीपाचा हंगाम धोक्याच्या सीमारेषेवर येऊन थांबल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.येत्या दोन-तीन दिवसात पाऊस झाला नाही तर त्याचा खोल परिणाम भातपिकांवर होण्याची भिती व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here