रायगडात पाच महिला नगराध्यक्ष

0
721

रायगड जिल्हयातील चार नगरपालिकामध्ये राष्ट्रवादीचे तीन नगरपालिकात काॅग्रेसचे एका ठिकाणी शेकाप आणि एका ठिकाणी शिवसेनेचे नगराध्यक्ष विराजमान झाले आहेत.जिल्हयात एकूण पाच महिला नगराध्यक्षा झालेल्या आहेत.

रायगड जिल्हयातील नगरपालिकांचे नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षांच्या आज निवडणुका झाल्या.बहुतेक ठिकाणी निवडणुका बिनविरोध पार पडल्या.,पनवेल येथे काॅग्रेसच्या चारूशीला घरत,यांची अध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे.महाड येथे काॅग्रेसच्या भारती सतीश सपकाळ, पेणमध्ये काॅग्रेसच्या प्रतिम पाटील, यांची निवड झाली आहे. माथेरान येथे राष्ट्रवादीच्या दीव्या डोईफोडे, खोपोलीत राष्द्रवादीचे दत्ताजी मसुरकर,यांची बिनविरोध निवड झाली आहे.सवार्ंच लक्ष लागून राहिलेल्या रोहा नगरपालिकेच्या अध्यक्षपदी अखेर सुनील तटकरे यांचे पुतने अवधूत तटकरे यांची बिनविरोध निवड झाली .श्रीवधर्नमध्ये कविता कृष्णा सातनाक यांची निवड झाली आहे.अलिबागेत शेकापपचे प्रशांत नाईक यांची निवड झाली आहे.उरण येथे शिवसेनेचे गणेश भास्कर शिंदे,अध्यक्ष झाले आहेत.मुरूड येथे आरक्षित गटातील कोणीही उमेदवार नसल्याने तेथील नगराध्यक्षपद रिक्त राहिले आहे.तर कजर्तमध्ये नगरपालिकेच्या नुकत्याच निवडणुका झालेल्या असल्याने तेथे आज नगराध्यक्ष निवडले गेले नाहीत.आजच्या निवडीवरून जिल्हयातील सवर्च पक्षांनी आपले बालेकिल्ले राखल्याचे दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here