अलिबाग- औषधी गुणधर्म आणि गोड-तिखट चवीमुळे लोकप्रिय असलेल्या अलिबागच्या पांढर्या कादयाला चांगला दर मिळू लागल्याने यंदा अलिबागसह पेण,महाड,रोहा,माणगाव,कर्जत आदि ठिकाणीही या कांद्याची लागवड होत असून जिल्हयात 250 हेक्टर क्षत्रफळावर पांढर्या कादयाचं पीक घेतलं जाण्याची शक्यता आहे.यापुर्वी जिल्हयात केवळ 130 हेक्टरवरच आणि तो ही अलिबाग परिसरातच पांढरा कांदा पिकविला जात होता.क्षेत्रफळ वाढले असल्याने यंदा जिल्हयात पांढर्या काद्याचे उत्पादन 2700 ते 2900 मॅट्रिक टन पर्यंत वाढेल असा विश्वास कृषी विभागाचे अधिकारी व्यक्त करीत आहेत.–