रायगडात कडेकोट पोलिस बंदोबस्त

0
829

रायगड लोकसभा मतदार संघात मतदानाला काही तासांचा अवधी उरलेला असल्याने मतदान शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून मतदार संघातील 125 संवेदनशील आणि 19 अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर चोख पोलिस बंदोबस्त करण्यात येणार आहे.19 अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे,वेबकास्टींग,सुक्ष्म निरिक्षण,व्हिडीओ कॅमेरे बसविण्यात येत असून गरजेनुसार एसआरपी जवान तैनात केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी दिली.

रायगड मतदार संघात सर्वधिक 9 अतिसंवेदनशील मतदान केंद्र पेण तालुक्यात आहेत.तर श्रीवर्धन तालुक्यात सर्वाधिक 37 संवेदनशील केंद्र आहेत.या केंद्रावर कुठेही कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये यासाठी रायगड मतदार संघात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.2 हजार पोलिस कर्मचारी,405 होमगार्ड,एक आरपीएफची कंपनी,एक एसआरपीएफची कंपनी,एक शिघ्रकृती दल प्लाटून आणि 4 दंगल नियंत्रण पथके जिल्हयात तैनात करणयात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी दिली.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here