रायगडात आज चौख बंदोबस्त

0
1026

बंगळुरूमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर आज साजऱ्या होणाऱ्या 31 डिसेंबरवर रायगड पोलिसांची करडी नजर असून जिल्हयात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.विशेषतः सागरी किनारे असलेल्या अलिबाग,मुरूड,दिवेआगर,किहिम ,मांडवा,नागााव ,आाक्षी,रेवदंडा,हरिहरेश्वर,आणि श्रीवर्धन या पोलिस ठाण्याच्या हद्दीत अधिक काळजी घेतली जात असून तेथील पोलिस कुमक वाढविण्यात आली आहे.सागरी सुरक्षेसाठी तीन स्पीड बोटी समुद्रात गस्त घालणार आहेत.जिल्हयात अन्यत्रही ऩऊ तपासणी नाके उभारण्यात आले आहेत.मद्यपान करूऩ वाहन चालविण्याऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी 80 वाहतूक कर्मचारी नेमण्यात आले आहेत अशी माहिती रायगडचे जिल्हा पोलिस अक्षीक्षक डॉक्टर शशिकांत महावरकर यांनी दिला.
उत्साहाच्या भरात समुद्रात जाऊन अपघाताच्या घटना रायगड जिल्हयात यापुर्वी अनेकदा घडलेल्या असल्याने त्याची पुनरावृत्ती यंदा होऊ नये यासाठी व्यवस्था कऱण्यात आली असून बचाव बोटी,लाइफ गार्ड,रूगण्वाहिका,समुद्र किनाऱ्यावर तैनात करण्यात आल्या आङेत.नागरी रक्षक दल आणि गृहरक्षक दलांच्या स्वयंसेवकांना जीवनरक्षक म्हणून तैनात कऱण्यात आले आहेत.बहुतेक किनाऱ्यांवर धोक्याच्या सूचना देणारे फलक लावण्यात आले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here