रायगडसाठी पैसा कमी पडणार नाही-मुख्यमंत्री

0
1077

अलिबाग- रायगड हा महाराष्ट्राचा मानबिंदु असून रायगड किल्लयाचे संवर्धन आणि विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही ,केंद्र आणि राज्य सरकार संयुक्तपणे ही जबाबदारी पेलतील असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रायगडावर दिले.
छत्रपती शिवाजी महाराज यांची 335 वी पुण्यतिथी आज रायगडावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात देवेद्र फडणवीस बोलत होते .कार्यक्रमास सहकार मत्री चंद्रकांत पाटील,रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता तसेच विनायक मेटे ,जिल्हयातील सर्वपक्षीय आमदार आणि शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यानी रायगडावर शासनाच्यावतीने दरवर्षी रायगड महोत्सव साजरा केला जाईल तसेच गडावरील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या वास्तूंची नव्यानं पण जुन्या पध्दतीनं डागडुजी केली जाईल असे जाहिर केले.मुंबई नजिक अरबी समुद्रात उभारण्यात येत असलेले शिवाजी महाराजांचे स्मारक हे जगातील सर्वात मोठे आणि भव्यदिव्य स्मारक असेल असेही मुख्यंमंत्र्यांनी स्पष्ट केले.
प्रारभी मुख्यमंत्र्यांनी होळीच्या माळावरील छत्रपतींच्या पुतळ्यास पुष्बहार अर्पण क रून शिवरायांना अभिवादन केले.जगदिश्वराच्या मंदिरात जाऊन त्यांनी तेथे दर्शन घेतले.यावेळी जयशिवाजी जय भवानी,छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या घोषणांनी सारा गड दणाणून गेला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here