पेण तालुक्यातील दाद र या अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर शिवसेना आणि कॅग्रेस यांच्यात झालेली मारामारी वगळता आज रायगड लोकसभा मतदार संघात सर्वसाधारण शांततेत मतदान झालं.मतदानाची वेळ संपल्यानंतर उपलब्ध आकडेवारीनुसार मतदार संघात सरासरी 64 टक्के मतदान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.2009 च्या तुलनेत हे मतदान 8 ते 9 टक्क्यांनी जास्त आहे.तरूणांनी मतदानासाठी दाखविलेला उत्साह,जिल्हा प्रशासनाने मतदान जनजागृतीसाठी केलेले अटोकाट प्रयत्न आदि कारणंामुळे यावेळेस मतांची टक्केवारी वाढल्याचं दिसते.रायगडमध्ये दिवसभर कडक उन्हाळा असतानाही मतदान केंद्रासमोर मतदारांनी रांगा लावल्या होत्या.ग्रामीण आणि शहरीभागातही मतदारांमध्ये चांगला उत्साह दिसत होता.
रायगडमध्ये प्रमुख पक्षांच्या चार उमेदवारांसह दहा उमेदवार निवडणूक रिंगणात असून त्यंाचे भवितव्य आता मतदान यंत्रात बंदिस्त झाले आहे.

LEAVE A REPLY