8 लाख मतदार उद्या मतदान करणार

0
707

रायगडमधील उरण,कर्जत,आणि पनवेल या तीन विधानसभा मतदार संघाचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदार संघातील मतदार उद्या मतदानाला सामोरं जात असून मतदानाच्या दृष्टीनं सारी व्यवस्था पूर्ण झाली असल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी दिली.

रायगड जिल्हयातील 4 लाख,49 हजार 369 पुरूष आणि 4 लाख 5 हजार 764 महिला असे मिळून 8 लाख 55 हजार 133 मतदार उद्या आपला खासदार निवडण्यासाठी मतदान करतील.उद्याचं मतदान लक्षात घेऊन जिल्हयात सर्वत्र कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here