रायगडमधील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी 

0
918
नोटाबंदीमुळे मंदावलेला रायगडचा पर्यटन व्यवसाय सलग तीन दिवस सुटया आल्याने पुन्हा एकदा बहरला आहे.शनिवार,रविवार आणि सोमवार अशी तीन दिवस सुटी असल्याने पुण्या-मुंबईला जवळचे असलेल्या रायगडमधील विविध पर्यटनस्थळांवर पर्यटकांनी गर्दी केली आहे.अलिबाग,मुरूड,हरिहरेश्‍वर आदि ठिकाणच्या बीचवर पर्यटकांची गर्दी दिसते आहे.किल्ले रायगड,माथेरान येथेही पर्यटकांनी गर्दी केली आहे.मात्र दरवर्षी डिसेंबरमध्ये जशी गर्दी होते तेवढी गर्दी यंदा नाही असे स्थानिक व्यापारी सांगतात.पर्यटक वाढले असले तरी नोटाबंदीमुळं पर्यटक हात आखडता घेतच खर्च करतात त्यामुळं छोटया व्यावसायिकांच्या व्यवसायात फार तेजी दिसत नाही.जेथे डेबिट-क्रेडिट कार्ट स्वीकारले जातात अशाच ठिकाणी राहणे,खाणे ,खरेदी करणे पर्यटक पसंत करतात असेही दिसून आले आहे.गेली तीन दिवस कोकणात मस्त थंडी असल्याने पर्यटक त्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसत आहेत.–

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here