रायगडमधील टँकरची संख्या वाढली

0
695

उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना रायगड जिल्हयात टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार्‍या गावांची संख्या सातत्यान वाढत आहे.28 एप्रिल पर्यंत जिल्हयात 185 गावे आणि वाड्यांना 25 टँकरमार्फत पाणी पुरवठा करण्यात येत होता.गेल्या पंधरा दिवसात यात वाढ झाली असून आता 4 3गावं आणि 291 वाड्या मिळून 334 वस्त्यांना 34 टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जात आहे.यामध्ये सर्वाधिक तहाणलेली गावं पोलादपूर,पेण आणि महाड तालुक्यात आहेत.पोलादपूरमध्ये 88 गावं आणि वाड्यांना सहा टँकरव्दारे पाणी पुरवठा केला जात आहे.तर महाड तालुक्यात 120 वाड्या आणि गावांना पाणी पुरविले जात आहे.सध्या जिल्हयातील धरणांत 30.53 दशलक्ष घनमीटर पाणी साठा उपलब्ध आहे.-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here