अलिबाग-रायगड जिल्हयाच्या 217 कोटी 60 लाख रूपयांच्या वार्षिक विकास आराखडयास शनिवारी मंत्रालयात अर्थ व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी दिली.यामध्ये जिल्हा वार्षिक योजनेसाठी 141 कोटी 51 लाख,आदिवासी उपाययोजनांसाठी 52 कोटी 86 लाख आणि अनुसुचित जाती योजनेसाठी 23 कोटी 23 लाख रूपयांची तरतूद कऱण्यात आली आहे.
बैठकीत जिल्हाधिकारी सुमत भांगे आणि अपर जिल्हाधिकारी प्रवीण शिंदे यांनी संगणकीय सादरीकरण करून जिल्हयासाठीचा वार्षिक आराखडा सादर केला.यावर झालेल्या चर्चेत पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्यासह जिल्हयातील लोकप्रतनिधीनीं महत्वाचे मुद्दे मांडले.
यावेळी जिल्हयातील खार भूमी,रायगड किल्लयावरील विश्रामगृहाचे बांधकाम,जिल्हयातील विविध विकास योजना ,नियोजन भवन आदींबाबत यावेळी चर्चा झाली.अंतिमतः निधी वाटप आणि विनियोग योग्य प्रकारे करण्याच्या सूचना करून आराखडा मंजूर कऱण्यात येत असल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.