राज ठाकरे यांचा ‘मराठा’ येतोय..

0
704

संयुक्त महाराष्टाची चळवळ आचार्य अत्रे यांच्या ज्या मराठाने ढवळून काढली त्या मराठाचे हक्क आता राज ठाकरे यांनी मिळविले आहेत.तो मराठा आता लवकरच दैनिक स्वरूपात पुन्हा एकदा सुरू केला जात आहे.मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मराठा हे दैनिक सुरू करीत आहेत.
सामना ही शिवसेनेची मोठी ताकद आहे.हे राज ठाकरे यांना नक्की माहिती आहे.सामनाच्या धर्तीवर एक दैनिक सुरू करण्याचे राज ठाकरे यांच्या गेली अनेक वर्षे डोक्यात होते मात्र ते शक्य होत नव्हते.आता लोकसभा आणि विधानसभेत मनसेला आलेले अपयश आणि येत्या काही दिवसात मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत असल्याने राज ठाकरेंना आपले दैनिक सुरू करण्याची गरज वाटायला लागली आहे.मुंबई मनपा निवडणुकीपुर्वी हे दैनिक सुरू होईल अशी अपेक्षा आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here