राज्यात मध्यावधी निवडणुकांचे पवारांचे संकेत

0
632

अलिबाग-अल्पमतात असलेले राज्य सरकार जास्त दिवस टिकणार नाही,हे सरकार टिकविण्याचा मक्ताही मी घेतलेला नाही,त्यामुळे राज्यात निवडणुका कधीही लागू शकतात तेव्हा कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आदेशच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत.
राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे दोन दिवसीय चिंतन शिबिर आजपासून अलिबाग येथील हॉटेल साई इनमध्ये सुरू झाले आहे.शिबिराचे उद्दघाटन पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झाले त्यावेळी केलेल्या उद्धघाटन पर भाषणात पवारांनी महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुकांची शक्यता व्यक्त करून खळबळ उडवून दिली आहे.यावेळी त्यांनी भाजप सरकार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सपाटून टिका केली.
शरद पवार यांनी आपल्या सविस्तर भाषणात सरकारवरील अविश्वास ठरावाच्या वेळेस राष्ट्रवादी कॉग्रेसचे आमदार तटस्थ होते असे स्पष्ट केले.राष्ट्रवादी कॉग्रेसची ताकद 148 जागा मिळविण्याची असली तरी विधानसभा निवडणुकात आमचे अंदाज चुकले,पक्षाला 60-70 जागा मिळतील अशी आम्हाला अपेक्षा होती मात्र प्रत्यक्षात 41 जागा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील विरोधकांच्या मतांमध्ये विभाजण कऱण्यासाठी भाजपमधील काही जण राज्यात एमआयएमला खतपाणी घालत असल्याचा गंभीर आरोप त्यानी केला.यामुळे सामाजिक ऐक्याला धोका निर्माण होऊ शकतो अशी भितीही त्यानी व्यक्त केली.
या शिबिरासाठी राज्याध्यक्ष सुनील तटकरे तसेच पक्षाचे अन्य मान्यवर नेते उपस्थित आहेत.राष्ट्रवादीच्या या शिबिराच्या निमित्तानं अलिबाग शहरात मोठी वातावरण निर्मिती कऱण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here