राज्यात दोन पत्रकारांवर हल्ले

0
840
 महाराष्ट्रात काल आणि आज  मुंबई आणि औरंगाबाद येथे दोन पत्रकारांवर हल्ले झाले तर अंबाजोगाई येथील दोन पत्रकारांना गंभीर गुन्हयात अडकवून माध्यमांचा आवाज बंद करण्याचा प्रकार घडला.एबीपी माझाचे प्रतिनिधी ऋुत्विक भालेराव यांना मुंबईत कुर्ला स्टेशनवर रेल्वे पोलिसांनी बेंदम मारहाण केली.या घटनेची तीव्र प्रतिक्रिया मुंबईतील मिडियात उमटली असून मराठी पत्रकार परिषदेचे मुंबई विभागीय चिटणीस हेमंत बिर्जे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने आज विरोधी पक्ष नेत ेराधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन हा मुद्दा विधान भवनात उपस्थित करण्याची मागणी केली.शिष्टमंडळात राहूल पहूरकर,विनोद राऊत ,सुरेश ठमके,शाहरूख मुलानी,प्रविण मरगळे तसेच विकास मिरगणे सहभागी झाले होते.काही पत्रकार मुख्यमंत्र्यांना ही भेटले .

अन्य एका घटनेत औरगाबाद येथील दीव्य मराठीचे पत्रकार दिनेश हरे यांना बसच्या कंन्डक्टरने माराहाण केली आहे.हरे औंरगाबादहून वडिगोद्रीला जात असताना कंन्डक्टर आणि त्यांच्यात बाचाबाची झाली.त्यातून कंन्डक्टरने त्याच्यावर जोरदार हल्ला चढविला.त्यांना गंभीर दुखापत झाली आहे.

तिसर्‍या घटनेत अंबाजागोगाई येथील स्थानिक वृत्तपत्र विवेकसिंधु आणि पुण्यनगरीच्या पत्रकारांवर 306 (34  कलमाखाली गुन्हा दाखल केला गेला आहे.एका कॉन्स्टेबलने आत्महत्या केल्याचे हे प्रकरण आहे.या तीनही घटनांमुळे महराष्ट्रात पत्रकारिता करणे किती कठिण झाले आहे याचा प्रत्यय परत येत आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या घटनाचां निषेध करीत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here