चार-पाच महिन्यापूर्वी सीएनएन-आय़बीएन सोडलेले ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई अखेर इंडिया टुडे ग्रुपबरोबर जोडले गेले आहेत.सल्लागार संपादक म्हणून ते रूजू झाले आहेत.राजदीप आता हेडलाईन्स टुडेवर अँकरिंग करताना दिसतील.
टाइम्स ऑफ इंडियाच्या मुंबई आवृत्तीचे सहा वर्षे संपादक राहिलेले राजदीप नंतर 1994 पासून इलेक्ट्रॉनिक मिडियाशी जोडले गेले.एनडीटीव्हीच्या स्थापनेच्या टीममधील ते एक शिलेदार होते.नंतर ते नेटवर्क -18 बरोबर जोडले गेले.मात्र या नेटवर्कची सारी सूत्रे रिलायन्सकडे गेल्यानंतर त्यांनी नेटवर्क-18 सोडले.तेथे त्यानी 9 वर्षे एडिटर इन चीफ म्हणून काम केले.
पत्रकारितेतील विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळविलेल्या राजदीप सरदेसाई यांना 2008मध्ये पद्मश्री हा पुरस्कार मिळाला होता.