राजदीप- उलट-सुलट प्रतिक्रिया

0
873

राजदीप सरदेसाई यांना न्यूयॉर्कमध्ये धक्काबुक्की झाल्यानंतर या घटनेचा अनेकांनी निषेध केला आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने देखील निषेध केला.कारण पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीसर्व पत्रकारांचे प्रतिनिधीत्व करते त्यामुळे पत्रकारावर हल्ला झाला,किंवा पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा प्रय़त्न झाला तर समितीचे कर्तव्य आहे की,संबंधित पत्रकाराच्या पाठिशी उभे राहणे.सरदेसाई यांच्यावरील हल्ल्याचा याच भूमिकेतून समितीने निषेध केला आहे.
सरदेसाई यांच्यावरील हल्ल्याबाबत दोन गोष्टींकडे अनेकांनी लक्ष वेधले.मुळात सरदेसाईवरील हल्लयाबाबत दुसरी बाजू तपासून पाहिली काय? असा प्रश्न काही मित्रांनी उपस्थित केला आहे. त्याचं उत्तर नाही असंच आहे.कारण तपासून पाहिले नसले तरी हल्लेखोर नमो भक्त होते आणि राजदीप यांनी घेतलेल्या सरकारविरोधी भमिकेमुळे हा हल्ला झाला असे सांगितले जाते.भूमिका कोणतीही असली तरी त्याचा आवाज बंद कऱण्याचा प्रय़त्न होत असेल तर असा प्रयत्न खपवून घेतला गेलाच नाही पाहिजे.समितीची तीच भूमिका आहे.
दुसरा मुद्दा असाही उपस्थित केला गेला की,बड्या पत्रकारांवर जेव्हा हल्ले होतात तेव्हा सारी बडी मंडळी चवताळून उठते आणि एखादया माजलगावच्या,वर्ध्याच्या ,साताऱ्याच्या अमरावतीच्या किंवा सावंतवाडीच्या पत्रकारावर हल्ला होतो तेव्हा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि तिच्याशी संबंधित पत्रकार संघटना सोडल्या तर कोणी साधं निषेधाचं पत्रकही काढत नाही.चॅनलवाले ती बातमी दाखवत नाहीत किंवा मुंबईतली बडी वर्तमानपंत्रं त्याची दखल घेत नाहीत.संबंधित पत्रकाराच्या बाजुने उभं राहण्याचं तर सोडाच उलटपक्षी ज्या पत्रकारावर हल्ला झालेला असतो त्यालाच अनेकदा आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जाते. असा अनुभव अनेकदा येतो.त्याबाबत समितीच्या बैठकीतही अनेकदा चर्चा झालेली आहे.बडी मंडळी जर आपली दखल घेत नसेल तर ते जेव्हा अडचणीत असतात तेव्हा आपण तरी कश्याला त्यांची तरफदारी करायची ? असा सवालही अनेकजण करतात. महाराष्ट्रात गेल्या नऊ महिन्यात दोन पत्रकारांचे खून झाले,सात जिल्हास्तरीय दैनिकांच्या कार्यालयावर हल्ले झाले आणि चाळीस पत्रकारांना मारहाण झाली,मात्र याच्या बातम्या अपवाद म्हणून देखील कोणी दिलेल्या नाहीत.निषेधही झालेले नाहीत.तेव्हा बड्या पत्रकारांसाठी तरी आपण कश्याला निषेध पत्रकं काढायची असा सवाल विचारलो जातो.असे सवाल विचारणाऱ्यांच्या भावना समजू शकतात पण असे करता येणार नाही.थोड्या व्यापक भूमिकेतून या साऱ्या प्रश्नांचा विचार करावा लागेल.पत्रकार अगोदरच विविध गटा-तटात विभागले गेलेले आहेत.आपण एकत्र नाहीत म्हणूनच सरकारवर जो दबाव यायला हवा तो येताना दिसत नाही.त्यामुळे पत्रकारांचे कोणतेच प्रश्न सुटत नाहीत.अशा स्थितीत पत्रकारांच्या एकीच ंदर्शन घडविणं आवश्यक आहे असे आम्हाला वाटते.त्यामुळं पत्रकार छोटा असो की,मोठा.प्रिन्टवाला असो की इलेक्टॉनिकवाला असा कोणताही भेद न करता कोणत्याही पत्रकारावर हल्ला झाला तरी त्याचा निषेध झालाच पाहिजे.समितीची हीच भूमिका असून ती अनेकदा कृतीतून दिसून आलेली आहे.शेवटी सर्वच फवत्रकार एकत्र येत नाहीत तोपर्यत पत्रकारांचे प्रश्न सुटणार नाहीत हे आपण साऱ्यांनीच लक्षात ठेवले पाहिजे.

राजदीप यांना धक्काबुक्की आणि प्रतिक्रिया…

ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना काल न्यूयॉक मर्ध्ये झालेल्या धक्काबुक्कीची बातमी मी फेसबुकवर टाकल्यानंतर त्या बातमीच्या अनुषंगाने अनेक उलट-सुलट प्रतिक्रिया आल्या आहेत.काहींनी राजदीप यांनी स्वतःच हा ड्रामा केला असा आरोप केलाय तर काहीनी ही पत्रकाराच्या आक्रस्ताळेपणातून घडलेली घटना असल्याचे म्हटले आहे.काहींनी तर अगोदर शिविगाळीला आणि धक्काबुक्कीला सुरूवात राजदीप यांनीच केल्याचे उपलब्ध व्हिडीओवरून दिसतंय असं वास्तव समोर आणलं आहे तर काही पत्रकार मित्रांनी घटनेचा निषेध केला आहे.या सर्व प्रतिक्रिया येथे मुद्दाम देत आहे.या परस्पर विरोधी प्रतिक्रिया बघता या प्रखरणावरून पत्रकारांमध्येच दोन गट पडल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रतिक्रिय ज्येष्ट पत्रकारांनी आपली वर्तवणूक कशी ठेवायला हवी,समाजात कसं वागायला हवं याचं भान आणून देणाऱ्या आहेत.सर्व पत्रकार मित्र याचा बोध घेतील अशी अपेक्षा आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती मात्र आपल्या भूमिकेवर ठाम आहे.विचारांचा सामना विचारांनीच केला पाहिजे अशी आमची भूमिका असून राजदीप यांना झालेल्या धक्काबुक्कीचं कोणत्याही स्थितीत समर्थन करता येणार नाही.राजदीप यांना अडवून त्याच्यावर आक्षेपार्ह शेरेबाजी कऱणे हे देखील योगय नाही असं मला वाटतं.

निषेध
न्यूयॉक मर्ध्ये ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना धक्काबुक्की झाल्याचे वृत्त आहे.स्वतः राजदीप यांनी देखील त्याबाबतचे टिव्ट केले आहे.राजदीप सरदेसाई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तीव्र शब्दात धिक्कार करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here