75 वर्षांची जुनी परंपरा असलेल्या मराठी पत्रकार परिषदेशी सलग्न असलेल्या रत्नागिरी जिल्हा पत्रकार संघांची जुनी कार्यकारीणी आज परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विश्वस्त श्री.किरण नाईक यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कोकण विभागीय अधिस्विक्रुतीचे अध्यक्ष श्री.मिलींद अष्टीवकर तसेच परिषदेचे विभागीय कार्यवाह श्री.विकास महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय विश्राम ग्रुह रत्नागिरी येथे खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.या बैठकीला जिल्ह्यातील 41 पत्रकार उपस्थित होते.
याच बैठकीत जिल्ह्याची पुर्वी असणारी कार्यकारीणी बरखास्त केली असल्याचे जाहिर करुन 60 दिवसांसाठी नवीन अस्थायी समिती एकमताने नियुक्त करण्यात आली आहे.
यामध्ये
अध्यक्ष – अभिजीत हेगशेट्ये
उपाध्यक्ष – सचिन देसाई
सचिव – सुनिल चव्हाण
कोषाद्यक्ष – धनश्री पालांडे
का.सदस्य – राजेश शेळके
प्रकाश वराडकर
अलिमीया काझी
▪तालुका निहाय ▪
रत्नागिरी किशोर मोरे
सुदेश शेट्ये
संगमेश्वर संदेश सप्रे
धिरेंद्र मांजरेकर
लांजा राजेंद्र बाईत
राजापुर नरेंद्र मोहिते
सुंदर पाटणकर
चिपळुण योगेश बांडागळे
सतिश कदम
गुहागर विनोद घाडे
खेड बुवा जंगम
दिलीप देवळेकर
दापोली प्रसाद रानडे
मुश्ताक खान
मंडणगड विजय जोशी
———————————————
वरील समितीने तालुक्यातील सर्व पत्रकाराना वार्षिक 310/- रुपये वर्गणी भरुन सभासद करुन घ्यावयाचे आहे.यासाठी पत्रकाराने आपल्या पेपरची ओळखपत्राची सत्यप्रत अथवा वर्तमानपत्राचे वार्ताहर म्हणुन काम करीत असल्याचे पत्र द्यावयाचे आहे.
▪ 45+ 15 या 60 दिवसांच्या कालावधीत सदस्य नोंदणी झाल्यावर आवश्यकता भासल्यास स्थिर कार्यकारीणीसाठी निवडणुक घेतली जाईल.यामध्ये वार्षिक वर्गणी भरुन सदस्य झालेल्यानाच मतदानाचा अधिकार राहील.
आजच्या बैठकीत रत्नागिरीतील पत्रकार भवनाचे काम पुर्ण करणे , अधिस्विक्रुतीची प्रक्रीया सहज आणि सोपी करणे , पत्रकार हल्ला कायदा मसुदा , निव्रुत्तीवेतन , ग्रुहप्रकल्प आदि विषयांवर सविस्तर चर्चा झाली.उपस्थित करण्यात आलेल्या शंकाना मान्यवरानी समाधानकारक उत्तरे दिली.
पत्र्काराना विविध संघटना , गट तट विसरुन आपल्या हक्कांसाठी एकत्र या असे आवाहन आदरणीय एस.एम.देशमुख सर यानी केले असल्याने आपण सर्वानी त्याला उत्तम सहयोग दिल्याबद्दल किरण नाईक यानी सर्वाना धन्यवाद दिले.
विकास महाडिक यानी उपस्थितांचे आभार मानले.प्रारंभी अनघा निकम यानी उपद्थित पदाधिका-यांचे पुष्प गुच्छ देवुन स्वागत केले.
अखेरीस नवीन अस्थायी समितीला शुभेच्छा देवुन सभेची सांगता झाली.