युपीत पत्रकाराला जिवंत जाळले
उत्तर प्रदेशच्या शाहजाॅहपूरहून आलेली बातमी किमान पत्रकारांच्या अंगाचा थरकाप उडविणारी आहे.तेथील एक स्वतंत्र व्यवसायी पत्रकार जगेंद्रसिंह यांना पोलिसांनीच अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले आहे.राज्याचे राज्यमंत्री राम मूर्ती सिंह वर्मा यांच्या अादेशानं हे हत्याकांड केल्याचं जगेंद्रसिंह यांनी आपल्या मृत्यू पूर्वे जबानीत म्हटलं असून वर्मा यांना अटक कऱण्यात आली आहे.
हिंदुस्थान,अमरउजाला सारख्या प्रतिष्ठीत दैनिकांसाठी काम केल्यानंतर जगेंद्रसिंह सध्या शाहजाॅहपूर समाचार नावाचे फेसबुक पेज तयार करून त्यावर बातम्या टाकत असे.ददरौल विधानसभा मतदार संघाचे आमदारराम मूर्ती सिंह वर्मा यांनी केलेल्या बलात्कार आणि अनैतिक मागार्ंनी संपत्ती जमा केल्याच्या काही बातम्या जगेंद्रनं आपल्या फेसबुक पेजवर टाकल्या होत्या.त्यानंतर १ जून पासून जगेंद्र बेपत्ता होता.नंतर तो अधर्वट जळालेल्या अवस्थेत सापडला.त्याला रूग्णालयात दाखल केले असता तेथे उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले. मृत्यू पूर्वे जबानीत त्यानं वमार् यांच्या आदेशानं पोलिसांनी आपल्याला जिवंत जाळल्याचे म्हटले आहे.आपल्या जिविताला धोका असून आपल्याला पोलिस संरक्षण मिळावे अशी मागणी जगेंद्रसिह यानं केली होती.त्यानुसार त्याला संरक्षण देण्याएेवजी कोणी अनिल भदोरिया यांच्या तक्रारीवरून त्याचंय् विरोधात खंडणी,अपहरासारखे गंभीर गुन्हे दाखल कऱण्यात आले होते.पोलिसांचं म्हणणं असंय की,जगेंद्र काही दिवसांपासून फरार होता आणि त्यानं स्वतःच आपल्या अंगावर पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून दिले आहे.
या प्रकरणाचा युपीतील पत्रकारांनी निषेध केला आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती या कृत्याचा निषेध करीत असून पत्रकारांना कसलेही संरक्षण नसल्यानं अशा घटना वारंवार घडत असल्याचे समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी म्हटले आहे.केंद्र सरकारनेच पत्रकार संरक्षण कायदा देशभर लागू करावा अशी मागणीही समितीने केली आहे.