म्हणे मारेकर्‍यांची नावं कळली..

0
848

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा शोध सुरू आहे.तपास संपत आला असून मारेकर्‍यांची नावे लवकरच जाहीर केले जातील असे पोलिसानी सांगितले.मात्र आरोपी पकडले कधी जातील हे पोलीस सांगत नाहीत.
बंगळुरू : कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा तपास पूर्ण होत आला आहे. मारेकऱयांची नावे काही आठवड्यात उघड केली जातील, असे कर्नाटकचे गृहमंत्री रामलिंग रेड्डी यांनी आज (शनिवार) सांगितले.

चौकशी यंत्रणांनी मारेकऱयांभोवती फास आवळायला सुरूवात केली आहे. ‘मात्र, अशा प्रकरणांची चौकशी पूर्ण करण्यासाठी मर्यादित काळाचे बंधन घालता येत नाही. काही आठवडेच आता शिल्लक आहेत, इतके मी सांगू शकेन. दाभोलकर आणि पानसरे हत्येप्रकरणासारखे गौरी लंकेश प्रकरणाबाबत झालेले नाही. आमच्या स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीमने (एसआयटी) लंकेश यांच्या मारेकऱयांची ओळख पटवलेली आहे. सध्या तपास यंत्रणा पुरावे गोळा करीत आहेत,’ असे रेड्डी यांनी स्पष्ट केले.

गौरी लंकेश या उजव्या विचारसरणीच्या कट्टर विरोधक म्हणून प्रसिद्ध होत्या. लंकेश पत्रिके या साप्ताहिकाच्या त्या संपादक होत्या. शिवाय, अनेक वृत्तपत्रांमध्ये त्यांचे स्तंभलेखन प्रसिद्ध होत असे. टीव्ही वाहिन्यांवरील चर्चेत त्यांचा हिरीरीने सहभाग असे. त्यांची पाच सप्टेंबरला त्यांच्या राहत्या घरी अनोळखी मारेकऱयांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

लंकेश यांनी भाजपच्या काही नेत्यांविरुद्ध लिखाण केल्याबद्दल खासदार प्रल्हाद जोशी यांनी त्यांच्यावर बदनामीचा खटला दाखल केला होता. त्यामध्ये लंकेश यांना दोषी ठरविण्यात आले होते. लंकेश यांचे बंधू इंद्रजित यांनी लंकेश यांच्याविरुद्धचे बदनामीचे सर्व खटले सीबीआयकडे चालविण्यास देण्याची मागणी मध्यंतरी केली होती. लंकेश यांच्यावर बदनामीचे अनेक खटले दाखल केले जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले होते.

लंकेश यांच्या हत्येप्रकरणी एसआयटीच्या हाती महत्त्वाची माहिती मिळाली असल्याचे रेड्डी यांनी ऑक्टोबरमध्येही सांगितले होते

सकाळ वरून साभार 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here