पत्रकारितेत काही अपप्रवृत्तींचा सुळसुळाट झाल्याने एकूणच पत्रकारितेबद्दल मोठ्या प्रमाणात संशयाचं वातावरण आणि लोकांमध्ये संतापाची भावना बघायला मिळते आहे.खंडणी,हाप्ते याच्या माध्यमातून पत्रकारितेला बदनाम कऱण्याच्या घटना गेल्या दोन दिवसात मुंबई-आणि पुण्यात घडलेल्या आहेत.
मुंबईत आरे कॉलनी पोलिसांनी तीन पत्रकारांना खंडणी वसूल करताना रंगेहात पकडले आहे.फिर्यादी कांजी महाजन यांची दुकान आहे.तेथून ते राशनची काळाबाजारी करतात म्हणून त्यांच्याकडून आरोपी खंडणी वसूल करीत होते.कांजी महाजन यांनी तीन पत्रकारांना यापुर्वीच 30 हजार रूपये दिले होते.त्यानंतरही समाधान न झालेल्या पत्रकारांनी त्यांच्याकडून आणखी 40 हजाराची मागणी केली होती.याची तक्रार महाजन यांनी पोलिसात नोंदवली त्यानंतर आरोपी पत्रकारांना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे.
दुसरी घटना काल पुण्यात घडली.तुरूंग महानिरिक्षकांना पाच लाखाची खंडणी मागण्याचं धाडस पुण्यातील दोन पत्रकारांनी केलं ते त्यांच्या भारीच अंगलट आलं.तुमच्या काही भानगडी आमच्याकंडं आहेत त्या छापू नये असे तुम्हास वाटत असेल तर पाच लाख रूपये द्या अशी मागणी करणारे एस.एम.एस आणि फोन तुरूंग डीआयजींना दोन पत्रकारांनी पाठविले होते.त्यावरून तुरूग अधिकाऱ्यांनी एरवडा पोलिसात तक्रार दाखल केली होती.त्यानुसार काल 10हजार रूपये स्वीकारताना पोलिसांनी दो न पत्रकारांना रंगेहात पकडले.
दोन दिवसात घडलेल्या या दोन्ही घटना एकूणच पत्रकारितेला बदनाम कऱणाऱ्या आहेत.जनतेनेही आता कोणी पत्रकार खंडणी किंवा हाप्ता मागत असेल तर त्याची तक्रार पोलिसात दिली पाहिजे.जेणे करून अशा खंडणीबाज पत्रकारांवर काही प्रमाणात तरी वचक बसेल.
आम्ही पत्रकारांच्या हक्कासाठी गेली पंचवीस वर्षे लढतो आाहोत.आमची ही लढाई यापुढेही चालू राहिल मात्र पत्रकारितेबद्दल समाजमनात घृणा निर्माण करणारी कोणीचीही कोणतीही कृती आम्हााला मान्य नाही.अशा घटनांचा आम्ही निषेध करतो.
Delhi madhe marathi patrakar kotya dhish aahet. Patrakarita ha dhanda zala aahe ?