मुंबई – गोवा महामार्ग मृत्यूचा सापळाच

0
891

मागील तीन वर्षांपासून सुरू असलेले मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम ठप्प झालं आहे. त्यामुळे प्रवाशांना आणि वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे. वाहनांच्या पर्यायाने अपघातांच्या वाढत्या संख्येमुळे मुंबई – गोवा महामार्गाचे चौपदरीकरण गरजेचं झालं होतं. रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी यासाठी सातत्याने आंदोलनं केली. त्यानंतर या कामाला तीन वर्षांपूर्वी सुरूवात झाली. पहिल्या टप्प्यात पळस्पे ते इंदापूर या 84 किलो मीटरचे काम हाती घेण्यात आलं . सुरूवातीला जलदगतीने होणार्‍या कामाची गती पुढे कमी झाली आता हे काम पूर्णपणे ठप्प झालं आहे.

मुंबई – गोवा महामार्ग जणू मृत्यूचा सापळाच बनलाय. गेल्या पाच वर्षात या मार्गावर झालेल्या 2 हजार 973 अपघातांमध्ये 685 जणांचा मृत्यू झाला असून 2 हजार 543 जण गंभीर रित्या जखमी झाले आहेत. ही आकडेवारी पाहिल्यानंतर त्याची भयानकता समोर येते.

2010 मध्ये 675 अपघात 182 जणांचा मृत्यू 682 प्रवाशी गंभीर जखमी

2011 मध्ये 611 अपघातांची नोंद यामध्ये 136 जणांचा बळी , तर 435 प्रवाशी जखमी

2012 मध्ये 619 अपघातात 124 जणांचा मृत्यू , तर 433 प्रवाशी गंभीर जखमी

2013 मध्ये 487 अपघातात 122 प्रवाशांचा मृत्यू , 339 जण गंभीर जखमी

2014 मध्ये 457 अपघातांची नोंद, यात 93 जणांचा बळी गेला तर 327 प्रवाशी गंभीर जखमी झाले

2015 मध्ये एप्रिल अखेर ार्यंत 124 महामार्गावर अघातांची नोंद झाली, यात 28 जण दगावले तर 327 जण जखमी 

2 महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी या कामाची पाहणी केली. त्यावेळी हे काम जलदगतीने सुरू करावे अन्यथा काळ्या यादीत टाकण्यात येईल असा इशाराही चंद्रकांत पाटलांनी दिला होता. परंतु त्यांच्या इशार्‍याला ठेकेदाराने दाद दिल्याचे दिसत नाही. कामात कुठेही गती आल्याचं दिसत नाही.

पत्रकारांच्या आंदोलनामुळे हे काम सुरू झालं असल तरी ते वेळेत पूर्ण होत नाही. त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतोय .शासनाच्या या नाकर्तेपणा विरोधात पत्रकारांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची तयारी सुरू केली आहे.

घटनाक्रम

9जुलै 2008     –        मुंबई-गोवा महामार्ग रूंदीकरण मागणीसाठी    पत्रकारांचा आंदोलनाचा निर्णय. 15 ऑग

                                       रोजी  वडखळ नाक्यावर   रस्ता रोको करण्याचा इशारा

 12 ऑगस्ट2008       – मंत्रालयात सुनील तटकरे यांच्याकडं बैठक.तीन महिन्यात

                                   कामाच  टेंडर निघेल असे आश्वासन.आंदोलन मागे

                                    धेण्याचे आश्वासन.आंदोलन स्थगित.

 2 ऑक्टोबर 2009  –    सुनील तटकरेंच्या आश्वासनानंतर वर्ष उलटले तरी

                                   काम सुरू  त्यामुळं वडखळ नाक्यावर गांधीगिरी आंदोलन

 18 नोव्हेंबर 2009  –     रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांचे लाक्षणिक

                                     उपोषण.300पत्रकारांचा सहभागट

 16 डिसेंबर 2009  –    कशेडी घाट रोको आंदोलन.तिनही जिल्ह्यातील

                                   500पत्रकारांचासहभाग

 16 डिेसेंबर 2009  –   विधान परिषदेत प्रश्न उपस्थित.सहा महिन्यात काम सुरू करण्याचं

                                  आश्वासन

 4 जानेवारी 2010  –    केंदी्रय पर्यावरण मंत्रालयाच्या न्रॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफने

                                  कर्नाळा अभयारण्यातून रस्ता चौपदरीकरणाचा प्रस्ताव फेटाळला.

 19 जानेवारी 2010  –  छगनराव भुजबळ यांच्याकडं सह्याद्रीवर पत्रकारांची बैठक.सुनील

                                    तटकरे,नारायण राणे उपस्थित.

 20जानेवारी 2010  –     कर्नाळा अभयारण्यात मानवी साखळी आंदोलन.दीड किलो मीटरची

                                      मानवी साखळी तयार.पथनाट्य सादर

 21 फेब्रुवारी 2010  –     चिपळून येथे पत्रकारांचा मशाल मार्च.चिपळूणकराचंाही या अनोख्या

                                     आंदोलनात उस्फुर्त प्रतिसाद

 2मार्च 2010   –            मुंबई येथे एस.एम.देशमुख यांची पत्रकार परिषद

 24मार्च 2010  –           युसूफ मेहरअली सेंटर  तारा येथे कोकणातील पत्रकारांचा मेळावा.

                                      महामार्ग चौपदरीकरण पत्रकार कृती समिती स्थापन.

                                      एस.एम.देशमुख यांची अध्यक्षपदी निवड

 31मार्च 2010    –           काम सुरू कऱण्याची भुजबळ यांची विधान परिषदेत घोषणा

 30नोेव्हेबर10  –            30नोेव्हेबर10 पर्यत काम सुरू कऱण्याचं भूजबळ यांचं पुन्हा

                                         विधान परिषदेत आश्वासन.प्रत्यक्षात काम सुरू नाही.

 6 एप्रिल 2010  –           मुंबई येथील आझाद मैदानावर पत्रकारांची धरणं आंदोलन

 26जानेवारी 2011  –      कशेडी ते पळस्पे या 154 किलो मीटर दरम्यान लॉंगमार्च

 15ऑगस्ट 2011  –      वडखळ नाका इथं पत्रकारांची निदर्शनं

 26 ऑगस्ट 2011  –      कोकणातील आमदारांची भुजबळांकडं बैठक.़़खड्‌ड्यावर चर्चा

 6 सप्टेबर 2011          कशेडी घाटात दरड कोसळून वाहतूक तीन दिवस ठप्प.रूंदीकरणाची गरज

 फेब्रुवारी 2012  –         रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामास शुभारंभ

 2 एप्रिल 2012  –        भुजबळ यांचं विधान सभेत उत्तर.केंद्राक़डून सहकार्य नाही.तक्रार

 14 एप्रिल 2012  –           पत्रकारांचा पेण येथे विजय मेळावा.

  25 जून 2014 रोजी       दुसऱ्या टप्प्याचं काम लवकर सुरू करावं यामागणीसाठी

                                        पत्रकारांचा   कशेडी घाट रोको आंदोलन

23 डिसेंबर 14-                  पत्रकाराचंा पेण येथे महामार्ग रोको आंदोलन

    असा आहे मुंबई-गोवा महामार्ग

 महमार्ग क ्रमांक –      एन.एच.17 नवा क्रमांक 66

 मार्गाची एकून लांबी –    1296 कोलो मीटर (हा महामार्ग देशातील सातव्या क ्रमांकाचा सर्वात

                                          लांबीचा महामार्ग आहे.

 महाराष्ट्रातील लांबी –       475 किलो मीटर

 गोव्यातील लांबी –         239 कोलो मीटर

 कर्नाटकातील लांबी –      288कोलो मीटर

 केरळमधील लांबी –        368 कोलो मीटर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here