मुंबई-गोवा महामार्ग रूंदीकरणाचं काम आता सुरू झालं असलं तरी कोकणातील
प6कारांना त्यासाठी सातत्यानं पाठपुरावा करावा लागला आणि आंदोलनंही करावी लागली आहेत.त्याचाच हा तपशिल.
कोकणातील पत्रकारांचा हा लढा खऱ्या अर्थानं एतिहासिक ठरला आहे.
———————————————————————–
घटनाक्रम
19जुलै 2008 – मुंबई-गोवा महामार्ग रूंदीकरण मागणीसाठी कोकणातील
पत्रकारांचा आंदोलनाचा निर्णय.15 ऑगस्ट रोजी वडखळ नाक्यावर
रस्ता रोको करण्याचा इशारा
12 ऑगस्ट2008 – मंत्रालयात सुनील तटकरे यांच्याकडं बैठक.तीन महिन्यात कामाचे
टेंडर निघेल असे आश्वासन.आंदोलन मागे धेण्याचे आश्वासन.
आंदोलन स्थगित.
2 ऑक्टोबर 2009 – सुनील तटकरेंच्या आश्वासनानंतर वर्ष उलटले तरी काम सुरू नाही.
त्यामुळं वडखळ नाक्यावर गांधीगिरी आंदोलन
18 नोव्हेंबर 2009 – रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकारांचे लाक्षणिक
उपोषण.300पत्रकारांचा सहभागट
16 डिसेंबर 2009 – कशेडी घाट रोको आंदोलन.तिनही जिल्ह्यातील 500पत्रकारांचा
सहभाग
16 डिेसेंबर 2009 – विधान परिषदेत प्रश्न उपस्थित.सहा महिन्यात काम सुरू करण्याचं
आश्वासन
4 जानेवारी 2010 – केंदी्रय पर्यावरण मंत्रालयाच्या न्रॅशनल बोर्ड ऑफ वाईल्ड लाईफने
कर्नाळा अभयारण्यातून रस्ता चौपदरीकरणाचा प्रस्ताव फेटाळला.
19 जानेवारी 2010 – छगनराव भुजबळ यांच्याकडं सह्याद्रीवर पत्रकारांची बैठक.सुनील
तटकरे,नारायण राणे उपस्थित.
20जानेवारी 2010 – कर्नाळा अभयारण्यात मानवी साखळी आंदोलन.दीड किलो मीटरची
मानवी साखळी तयार.पथनाट्य सादर
21 फेब्रुवारी 2010 – चिपळून येथे पत्रकारांचा मशाल मार्च.चिपळूणकराचंाही या अनोख्या
आंदोलनात उस्फुर्त प्रतिसाद
2मार्च 2010 – मुंबई येथे एस.एम.देशमुख यांची पत्रकार परिषद
24मार्च 2010 – युसूफ मेहरअली सेंटर तारा येथे कोकणातील पत्रकारांचा मेळावा.
महामार्ग चौपदरीकरण पत्रकार कृती समिती स्थापन.
एस.एम.देशमुख यांची अध्यक्षपदी निवड
31मार्च 2010 – काम सुरू कऱण्याची भुजबळ यांची विधान परिषदेत घोषणा
30नोेव्हेबर10 – 30नोेव्हेबर10 पर्यत काम सुरू कऱण्याचं भूजबळ यांचं पुन्हा
विधान परिषदेत आश्वासन.प्रत्यक्षात काम सुरू नाही.
6 एप्रिल 2010 – मुंबई येथील आझाद मैदानावर पत्रकारांची धरणं आंदोलन
26जानेवारी 2011 – कशेडी ते पळस्पे या 154 किलो मीटर दरम्यान लॉंगमार्च
15ऑगस्ट 2011 – वडखळ नाका इथं पत्रकारांची निदर्शनं
26 ऑगस्ट 2011 – कोकणातील आमदारांची भुजबळांकडं बैठक.़़खड्ड्यावर चर्चा
6 सप्टेबर 2011 कशेडी घाटात दरड कोसळून वाहतूक तीन दिवस ठप्प.रूंदीकरणाची गरज
2 एप्रिल 2012 – भुजबळ यांचं विधान सभेत उत्तर.केंद्राक़डून सहकार्य नाही.तक्रार
महमार्ग क ्रमांक – एन.एच.17 नवा क्रमांक 66
मार्गाची एकून लांबी – 1296 कोलो मीटर (हा महामार्ग देशातील सातव्या क ्रमांकाचा सर्वात
लांबीचा महामार्ग आहे.
महाराष्ट्रातील लांबी – 475 किलो मीटर
गोव्यातील लांबी – 239 कोलो मीटर
कर्नाटकातील लांबी – 288कोलो मीटर
केरळमधील लांबी – 368 कोलो मीटर
सुरूवात-शेवट – महाराष्ट्रातील पळस्पे येथून सुरूवात केरळमधील कोची नजिक इडापल्ली येथे
हा महामार्ग संपतो.
भाषा – महाराष्ट्र,गोवा, कर्नाटक,आणि केरळ अशा चार राज्यातून हा महामार्ग जातो.
महामार्गावर मराठी,मालवणी,कोकोणी,कन्नड,आणि तुलू अशा भाषा बोलल्या
जातात.शेती आणि मासेमारी तसेच आता पर्यटन हे येथील लोकाच्या
उपजिविकेची साधनं आहेत.
महामार्गावरील जक्शन- एनएच4हा पनवेलजवळ एनएच17ला मिळतो, एनएच204 पालीजवळ,
एनएच-4ए पणजीजवळ,17ऐ कोर्टालिम,एनएच 17ए वेर्णा,एनएत63
अंकोला,एनएच13मंगलोर,एनएच48 मंगलोर,212 कोझिकोड एनएच47
इर्नाकुलम-कोची,एनएच 47 इडापल्ली -कोची
वाहतूक जनगणनेनुसार
सरासरी वाहतूक वर्दळ- 1लाख85हजार942 मे.टन प्रतिदिन
रायगडातील लांबी – पळस्पे ते कशेडी 154.300किलो मीटर
महामार्गाची रूंदी – अंदाजे 7 मीटर
जमिन संपादन – पळस्पे ते इंदापूर या मार्गावर 80 गावातील 225 हेक्टर जमिन संपादित
करावी लागणार आहे
रायगडातील अपघात
स्थळांची संख्या – 57 (वड़खळ पोलिस हद्द-14,पेण11,नागोठणे7,रोहा 8,गोरेगाव 5,
महाड शहर 5,महाड ग्रामीण 4,पोलादपूर 4 एकून 57
अपघात स्थळांची नावं – पेण(तरणखोप,जिते,रामवाडी,खारपाडा,गोविले,हमरापूर,कासू,ईरवाडी,उचेडे
वडखळ-(वडखळ,डोलवी,कारावी,आमटेम,खारपाले,पाटणी,निगडे,कोलेटे,
पांडापूर,लांगीवाडी,इंद्रनगर,ढोंबी,गडब
नागोठणे (आयपीसीएल ते पेणफाटा,सुकेळी,ऐनघर,रामनगर,नागोठणे,मुद्रा
हॉटेल ते पळस जिंदाल कंपनी
रोहा (खांब,जुई,वरसगाव,आंबेवाडी,आंबेवाडी,कोलाड,तळवली,सुकेळी,पुगाव
गोरेगाव (तळेगाव,लोणेर,वडपाले,खांडपाले)
महाड शहर ( दासगाव खिंड,गांधारपाले,कें बुर्ली,वहूर )
महाड ग्रामीण ( वीर कपिलाबंदर,टोळफाटा)
पोलादपूर ( पोलादपूर,पारले,केदारमाळ,चोळई,भोगाव )
महामार्गाच्या तिनही – एकूण अपघात — 8056
जिल्ह्यात 2006ते फेटल अपघात — 1165
2011 या सहा – मयत व्यक्ती — 1562
वर्षातलेअपघात गंभीर अपघात — 2075
गंभीर जखमी — 4517
किरकोऴ अपघात- 1979
किरकोळ जखमी 4145
विना दुखापत 2842
रायगडमधील अपघात – 2010मध्ये 202 अपघात झाले,त्यात 162 ठार आणि 587 जखमी
2011मध्ये 178 अपघात झाले त्यात 147 ठार आणि 538 जखमी
28मार्च 2012 पर्यतच्या 88दिवसात 43 अपघात 31 ठार 165 जखमी
मृतांची संख्या जास्त का़? अपघात झाल्यावर जागेवरच मृत्यूमुखी पडणारांचे प्रमाण 20 टक्के.70 टक्के
मृत्यू जखमींना रूग्णालयात नेताना होतात.कारण महामार्गावर कोठेही
रूग्णालय नाही.ऍम्ब्यूलन्सची सोयही नाही.मृतामध्ये जवळपास 30 टक्के
प्रवासी 18 ते 25 वयोगटातील असल्याचे कास्पच्या पाहणीत दिसून आलं
अपघातांची कारणे
1) अरूंद रस्ता 2) प्रचंड वळणं 3) क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक 4)भरधाव
धावणारी वाहनं 5) रस्त्यावरील पंचंड खड्डे 6)सुरक्षिततेचे उपाय नाहीत
7) रस्त्यावर ट्राफिक पोलिस नाहीत 8) वाहतूक वाढली ,रस्ते तेवढेच
9) ट्रेलर,टॅंकर,डंपर,ट्रक्स सारख्या अवजड वाहनांची वाढती संख्या
10) रस्त्यावरील वाढती अतिक्रमण
पत्रकार चौपदरीकरणाचीमागणी का करीत होते? –
1) चौपदरीकरण झाल्यानं अपघात कमी होतील
– 2)कोकणातील प्रवास सुखकर,निर्धोक होईल
– 3) पर्यटकांची संख्या वाढेल,कोकणाचा विकास होईल
– 4) दळणवाळण सोईचे झाल्यानं विकासाला गती येईल
– 5) महामार्ग क ्रमांक 4 चे रूदीकरण झाल्यानं गतवर्षीच्या तुलनेत
अपघात 84ने कमी झाले.तर द्रुतगती मार्गावरील अपघात
62 ने कमी झाले.म्हणजे चौपदरीकरण झाल्यानं अपघात
कमी होणार नाहीत हा दावा चुकीचा ठरणार आहे.
कोकणावर अन्याय –
1) मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग झाला
2) मुंबई-पुणे क्र.4 चे चौपदरीकरण झाले
3) मुंबई-नाशिक क्र.3 चे चौपदरीकरण झाले
4) मुंबई-अहमदाबाद क्रं.8 चे सहापदरीकरण झाले
5) पुणे -कोहापूर क्रं.4चे चौपदरीकरण झाले.आता 6पदरी होतोय
6) पुणे -औरंगाबाद चौपदरीकरण झाले
7) पुणे – सोलापूर क्रमांक 9 चे काम प्रगतीपथावर आहे
8) पुणे – नाशिक क्रं.50 प्रगती पथावर आहे
केवळ मुंबई-गोवा महामार्गाचे काम होत नव्हते.पत्रकारांना
त्यासाठी चार वर्षे संघर्ष करावा लागला.आता काम सुरू झालंय
काम का होत नव्हते याचं उत्तर कोणीच देत नाही.कोकणाचा
विकास होता कामा नये हाच यामागचा उद्देश असू शकतो.
महामार्गावरील महत्वाची गावं-
1) पनवेल( तालुका ठिकाण) 2) पेण (तालुका ठिकाण )
3) वडखळ 4) नागोठणे 5) कोलाड 6) इंदापूर 7)माणगाव(ता)
8) महाड (तालुका ठिकाण ) पोलादपूर (तालुका ठिकाण )
रत्नागिरी
1) कशेडी 2) भरणीनाका 3) खेड (तालुका) 4) आसुर्डे
5 ) परशुराम 6) लोटे 7) चिपळूण(तालुका ठिकाण )8)कामाठे
9) सावर्डे 10) आरावली 11) तुराळे 12) धामाणी 13)
संगमेश्वर (तालुका) 14)निवली 15) हातखंबा 16)पाली
17) रत्नागिरी
सिंधुदूर्ग जिल्हा
1) लांजा (तालुका ठिकाण )2) राजापूर ्र(तालुका ठिकाण )
3) खारेपाटण 4) तराळे 5) कणकवली 6) कुडाळ (तालुका)
7) वेंगुर्ला (तालुका ) सावंतवाडी (तालुका)
महामार्गावरील पर्यटन स्थळं रायगड जिल्हा
1) अलिबाग- सुंदर समुद्र किनारा,कोन्होजी आंग्रे समाधी
2) किहीम – सुंदर समुद्र किनारा
्र3) मुरूड जंजिरा- किल्ला,महामार्गापासून 60किमी आत
4) पाली – बल्लाळेश्वर अष्टविनायक मंदिर
6 ) दिवेआगर- सुवर्ण गणेश मंदिर.मूर्तीची नुकतीच चोरी
7) रायगड किल्ला- छत्रपती शिवाजी महाराज यांची राजघानी
8) चवदार तळे- डा्रॅ.आंबेडकरांनी परिवर्तनाची चळवळ सुरू केली
9)शिवथर घळ – रामदासांनी दासबोध इथंच लिहिला,महाडचवळ
10) पोलादपूर-उमरठला तानाजी मालुसरेंचे स्मारक
रत्नागिरी जिल्हा
1) गणपती पुळे- स्वयंभू गणेश मंदिर.सुंदर समुद्र किनारा
2) पावस – स्वामी स्वरूपानंदांचा आश्रम
3) राजापूरची गंगा- दर तीन वर्षानी गंगा येते.धार्मिक स्थळ
4) मांडवी बिच – भगवती किल्ला.नयनरम्य निसर्ग
5) मालगुंड – कविश्रेष्ठ केशवसुतांचे स्मारक
6) मालेश्वर – शंकराचे मंदिर.सुंदर धबधबा
7)लोटे – परशूराम मंदिर
8) लेण्या — खेड,दाभोळ,चिपळूण,संगमेश्वर येथील लेण्या
9)थिंबा पॅलेस- म्यानमारच्या राजासाठी बांधलेला राजवाडा
10) डेरवन -शिवसृष्टी .महामर्गाजवळ.चिपळूणनजिक
सिंंधूदुर्ग जिल्हा
1)सिंधुदूर्ग किल्ला- मालगाव तालुक्याती जलदुर्ग
2) तारकर्ली बिच – बिचेसची राणी म्हणून ओळखले जाते.
3) विजयदूर्ग – 48 एकरात पसरलेला हा जलदुर्ग नयनरम्य
4) कुणकेश्वर -वास्तूकलेचा अनोखा नमूना.900वर्षे जुने मंदिर
5)वैभववाडी – नापाणे धबधबा प्रसिध्द
6) फोडा घाट-कोल्हापूर-सिंघूदुर्गला जोडणारा हा घाट सुंदर आहे
7)रंगनागढ -भोज राजानं बांधलेला हा किल्ला.परिसर सुंदर आहे
8)आंबोली- 690 कि.मी.उंचीचं हिल स्टेशन
9) पॅलेस -किम खेम सावंत यांनी 300वर्षापूर्वी बांधलेला राजवाडा
10) तिल्लारी डॅम- मंगाली धबधबा,फणसवाडी धबधबा सुंदरआहेत
मुंबई-गोवा महामार्ग एका बाजूूला सह्याद्रीच्या रांगा आणि पश्मिेला
अरबी समुद्र अशा जातो.अनेक घाट तसेच वळणावळणाचा रस्ता
त्यामुळं सारा महामार्गावर निसर्गानं मुक्त हस्ते उधळण केल्या
सारखा भासतो.बॉम्बे टू गोवा या चित्रपटात सारा निसर्ग दिसतो.
महामार्गावरील पूल –
महामार्गावर एकूण 32 मोठे पूल आहेत.त्यापैकी 14 पुलांची
दुरूस्ती केली गेली आहे.111 लहान पूल आहेत.91 पुलांची दुरूस्ती
आहे.त्याचे क्षेत्रफऴ4.48 चौ.किं.मी.एवढे आहे.28 ऑक्टोबर 69
रोजी अभयारण्याचा दर्जा दिला गेला.या अभयारण्यात पूर्वी
विविघ जातीचे 146 पक्षी होते.मात्र सरकारी अनास्था आणि
पक्षीच नाहीत.तेव्हा अभयारण्यातील रस्ता चौपदरी झाला तर पक्षांना
धोका होईल हा दावा अनाठाई आहे.शिवाय मुंबई-सोलापूर रस्त्यावर
भिगवण जवळील ग्रेट इंडियन बस्टार्ट सेंच्यूरियन या अभयारण्याच्या
परिसरातून तो रस्ता जातो.तिथं विरोध झाला नाही.आता भिगवणच्या
अभयारण्यीचा परिसर कमी केला गेला आहे.
अभयारण्याला पर्यायी मार्ग – अभयारण्यातून आहे त्याच रस्त्यावर पूल टाकून हा प्रश्न सोडविता
येऊ शकतो.बोगदा करूनही हा प्रश्न सोडविता येईल.हे दोन्ही
पर्याय सरकारसमोर आहेत.अन्य पर्याय असे.
1) मुंबई ते वडखळ मार्गे अक्कादेवी ,शिक्री चाळ,भाल असा सर्व्हे
झाला होता.हा रस्ता झाला तर मुंबई-वडखळ हे अंतर 25 किमीने
कमी होईल शिवाय अभयारण्याचा प्रश्नही मिटेल.वडखळचा हा रस्ता
एनएच-4 बीला जोडून पुढे जावू शकेल.
2)खारपाडा ते चिरनेर,चिरनेर ते गव्हाण फाटा,ते उरण असा रस्ता
सध्या अस्तित्वात आहे.तो चंागला करता येऊ शकतो.
3)खारपाडा ते साई -वशेणी-केरवणे-पिरकोन-कोप्रोली-खोपटा
मार्गे उरण असा मार्ग निधू शकतो.
4) कोप्रोली-वशेणी-ते पेण तालुक्यातील हमरापूर असा एक मार्ग
होऊ शकतो.हमरापूर ते पामबिच मार्गे बेलापूर असाही मार्ग होऊ
शकेल.या भागात दादर-वशेणी अशी खाडी आहे तिंंंथं पुलाचं काम
झालेलं आहे.
महामार्गाची सद्दय स्थिती –
रायगड जिल्ह्यातील पहिल्या 84 किलो मीटरच्या रस्ता रूदीकरणा-
बाबत सडक परिवहन आणि राज्यमार्ग मंत्रालयाच्या वतीनं 29
ऑक्टोबर 2009 रोजी अधिसूचना गॅझेट ऑफ इंडियामध्ये प्रसिध्द
झाली आहे.रायगड जिल्ह्यातील पळस्पे (0.200) ते कशेडी 154/
300) असा 154 किमीचा रस्ता आहे.त्यापैकी पळस्पे इंदापूर हे 84
किमी चे अंतर चौपदरीकरणासाठी प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग
प्राधिकरण नाशिक यांनी हाती घेतले आहे.ते काम आता सुरू झालेले
आहे. 30 महिन्यात हे काम पूर्ण करायचे आहे.तसेच इंदापूर ते
ककशेडी या 77 किमीच्या रस्त्याचा सुसाध्यता
अहवाल तयार करण्यात आला असून तो केंद्राकंडं पडून आहे.
रत्नागिरी जिल्हा
कशेडी ते पात्रादेवी हा र20.91 किमीचा रस्ता रत्नागिरी सार्वजनिक
बांधकाम मंडळाच्या अखत्यारित येतो.त्या पैकी 450 ते 475
(झाराप ते पात्रादेवी ) असा 20.508 किमीच्या रस्त्याच्या रूंदी-
करणाचे काम प्रगतीपथावर आहे.उर्वरित रस्त्याच्या चौपदरीकरणा-
साठी सवे्रक्षण अहवाल तयार करण्यासाठी सल्लागार नेमन्यात आला
आहे.त्यानं सुसाध्यता अहवाल आणि अंदाजपत्रक तयार केले आहे.
ते मंजूरूसाठी केंद्राकडं पाठविण्यात आलं आहे.या अङवालात क शेडी
घाटात बोगद्याची तरतूद करण्यात आली आहे.झाराप-पात्रादेवी
हे काम डिसेंबर 2012 पर्यत पूर्ण होणार आहे.
छगन भूजबळ काय म्हणतात – 2 एप्रिल 2012 रोजी विधान सभेत महामार्ग रूदीकरण प्रश्नाला
उत्तर देताना भुजबळ म्हणाले,झाराप-पात्रादेवी काम केंद्राच्या
बजेटच्या माध्यमातून सुरू होते.त्यावेळी केंद्रीय अधिकाऱ्यांनी पाहणी
केली आणि अंडर पासेस,स्ट्रीट रूट,रिटेनिंग वॉल,आदि कामे त्यांनी
वाढविली.त्यामुळं 183 कोटीचं हे काम 274 कोटींवर गेलं.तथापि
हे वाढीव काम मंजूर करण्यास केंद्राकडून बरेच दिवस नकार
देण्यात येत होता.शेवटी मुख्यमंत्र्याची केंद्रीय मंत्र्यासोबत भेट
झाल्यावर कामास मंजूरी मिळाली.राज्य सरकारने इंंदापूर ते झाराप
या टप्प्यातील कामासाठी चार पॅकेज केंद्राला सादर केले आहेत.
3500कोटी रूपये खर्चाचा हा प्रकल्प आहे.ही कामं एनएचडीपी(
राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रंंम) मध्ये ध्यावीत यासाठी आम्ही
प्रयत्न केले कारण या योजनेत समाविष्ट नसलेल्या प्रकल्पाला
भूसंपादनासाठी केंद्र पैसे देत नाही.आाता हा प्रकल्प एनएचडीपीमध्ये
घेतल्यानं भूसंपादनासाठी सुमारे 850 कोटी राज्याला मिळतील.आता
या 850 कोटी बरोबरच व्हिजीएफ( व्हायबिलिटी गॅप फ ंडिंग)
पोटीचे 1000कोटी केंद्रानं तातडीनं मंजूर करणं आवश्यक आहे.
या शिवाय अन्य सुसाध्यता अहवालही मंजूर होण्याची आम्ही वाट
पहात आहोत.प्रकल्पाच्या पर्यावरण प्रस्तावांना अशतः मंजूरी मिळाली
आहे ती पूर्णता मिळणे आवश्य़क आहे.यासाठी आम्ही मुख्यमंङत्री
शरद पवार आणि राज्यातील खासदारांना पाठपुरावा करण्याची
विनंती करणार आहोत.
पिसीयू मुंबई पासून ङंदापूरपर्यत मोठी शहरं आणि आौद्योगिक वसाहती
असल्यानं इंथं वाहतूकीचं प्रमाण 30 हजार पीसीयू (पॅसेंजर कार
युनिट) एवढं आहे.त्यापुढं हे प्रमाण 12 हजार पीसीयू पर्य्रत कमी
कमी होतं.सदर रस्त्याची धावपट्टी दुपदरी असून मे 2009मध्ये
केलेल्या वाहतूक गणनेनुसार सरासरी वाहतुकीची वर्द1,85,942
मेट्रीक टन प्रतिदिन आहे.