कोकणातील पत्रकारांचा महाविजय

0
702

मुंबई-गोवा महामार्गाची केंद्रीय पथकानं केली पाहणी
दुसऱ्या टप्पयाचं काम लवकरच सुरू होणार 
अलिबाग- कोकणातील पत्रकारांनी 25 जून 2014 रोजी कशेडी घाटात केलेले “कशेडी रोको” आंदोलन आणि सततच्या पाठपुराव्यामुळं मुंबई-गोवा महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या चौपदरीकरणाचं  काम आता त्वरित मार्गी लागणार असून तसे पत्र पेण येेथील महामार्ग कार्यालयाने रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पवार यांना पाठविले आहे..सर्वेक्षण आणि भूसंपादनाची प्रर्किया सुरू झाल्याचा उल्लेख या पत्रात केला गेला आहे.रायगड प्रेस क्लबने या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही पत्र व्यवहार आणि पाठपुरावा केला होता.त्यांनीही मुंबईत पत्रकार परिषदेत मुंबई-गोवा महामार्ग हे माझे स्वप्न असून हा महामार्ग आपण लवकरच पूर्ण करू असे आश्वासन दिले होते.त्यानुसार आता कार्यवाहीला सुरूवात झाली आहे.कोकणातील पत्रकारांचा हा महाविजय समजला जात आहे.
7 जुलै रोजी भूसंपादनाची अधिसूचना प्रसिध्द झाली मात्र त्यानंतर कोणतीच हालचाल झाली नव्हती.त्यामुळे पत्रकारांना 25 जून रोजी कशेडी रोको आंदोलन करून अटक व्हावे लागले होते. पत्रकारांच्या या लढ्याची केंद्रीय पातळीवर देखल घेतली गेली असून आता शासकीय पातळीवर हालचाल सुरू झाली असून दिल्ली येथील रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या मुख्य अभियंता नागपाल यांच्या नेतृत्वाखाली एका पथकानं इदापूर ते कशेडी या दुसऱ्या ट्‌प्प्याची 9 आणि 10 जुलै रोजी या पाहणी केली..या पथकात महामार्गाचे अधीक्षक अभियंता मीना,महाडचे कार्यकारी अभियंता मोरे,शाखा अभियंता ए.एन.येरूणकर यांचा समावेश होता.पथकाच्या पाहणीनंतर आता भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहे.महामार्गासाठी माणगाव तालुक्यातील 25,महाड तालुक्यातील 12 आणि पोलादपूरमधील 8 आणि खेड तालुक्यातील 3 गावातील 40 हजार 753.84 चौरस मीटर जमिन संपादन केली जाणार आहे.इंदापूर-माणगाव ही गावं महाार्गालगत वसली असून माणगाव बाजारपेठ मुख्य मार्गाला लागूनच आहे.त्यामुळे हा रस्ता माणगाव,महाड आणि पोलादपूरला वळसा घालूनच जाणार असे दिसते.तसे नियोजन सुरू आहे. तसेच कशेडी घाटात बोगदा काढण्याचे नियोजन असून हा महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा असणार आहे.पत्रकारांच्या प्रयत्नानं महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला आता लवकरच सुरूवात होणार असल्यानं रायगडमध्ये आनंद व्यक्त होत आहे.
पत्रकारांच्या या आंदोलनात कोकणातील तीनही जिल्हयातील पत्रकारांनी एकजूट दाखवून ऐतिहासिक लढा दिला,सातत्यान पाठपुरावा केला त्यामुळेच अशक्य वाटणारे हे काम मार्गी लागले आहे.महामार्गाचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर आणि हा महामार्ग चौपदरीकऱण झाल्यानंतर अपघातांचे प्रमाण तर कमी होणार आहेच त्याचबरोबर हा मार्ग कोकणच्या विकासाचा महामार्ग ठरणार आहे.
आंदोलनात सहभागी होणारे तमाम पत्रकार तसेच आंदोलनास पाठिंबा दर्शविणारे सर्व नागरिक यांना पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमत्रक एस.एम.देशमुख मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस संतोष पवार रायगड प्रेस क्लबचे ,विजय पवार,मिलिंद अष्टीवकर,संतोष पेरणे,अभय आपटे दीपक शिंदे,यांनी धन्यवाद दिले आहेत.नितीन गडकरी यांनाही आभाराचे पत्र पाठविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here