भारत असो वा अमेरिका ..राज्यकर्त्यांसाठी मिडिया हा सॉफ्ट टार्गेट ठरतोय.मिडियाच्या नावानं तर इकडंही शिमगा चालू असतो..अन अमेरिकेतही.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंपनं अमेरिकन मिडियाला थेट देशद्रोही ठरवलंय.ते म्हणाले,मिडिया ज्या पध्दतीची माहिती लोकांसमोर मांडतोय त्यामुळं लोकाचं आयुष्यच धोक्यात आलंय.हे काम देश विरोधी आहे.असा दावाही ट्रंम्प यांनी केलाय.उन्मादी मिडिया जेव्हा सरकारच्या अंतर्गत चर्चेचा तपशील प्रसिध्द करते तेव्हा केवळ पत्रकारांची नाही तर जनतेचं जगणं जोखीममध्ये टाकत असते.अमेरिकनं राष्ट्राध्यक्षांनी एक ट्टिटव्दारे सुविचार व्यक्त केले आहेत.ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून त्यांचा मिडियावर राग आहे.–