मिडियावर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न वेगवेगळ्या पध्दतीनं सुरू आहेत.इशान्य भारतातील काही न्यूज चॅनल्स बॅन केले गेले आहेत.एनडीटीव्हीच्या बाबतीतही असाच प्रयत्न झाला.मात्र मोठा विरोध झाल्यानं तो निर्णय मागं घ्यावा लागला.त्यानंतर सामनावर बंदी घालण्याची मागणी भाजपकडूनच केली गेली.रजिस्ट्रार ऑफ न्यूज पेपरचे नियम अधिक कडक करून यापुढे कुणाला वर्तमानपत्रंच काढता येणार नाही अशी व्यवस्था केली जात आहे.हे सारं कमी होतं म्हणून की काय आता अऩेक न्यूज चॅनल्सची लाइसन्स रद्द केली गेली आहेत.ज्या न्यूज चॅनल्सचे लाइसन्स रद्द केले गेलेत त्यांची संख्या 13 आहे.यामध्ये दिल्ली येथील त्रिवेणी मिडिया या कंपनीचे सात चॅनल्सचा समावेश आहे.इतर कंपन्यांमध्ये सटलॉन एन्टरप्रायजेस,नियॉन सॉल्युशन,पोम्पाशा फिसल सर्व्हिसेस आदिंचा समावेश आहे.सटलॉन एंटरप्रायजेस गुजराती दैनिक संदेशचं भावंड आहे.संदेशची मालकी ज्या फाल्गुन पटेल यांच्याकडं आहे ते गुजरातचे पूर्व मुख्यमंत्री चिमनभाई पटेल यांचे नातेवाईक आहेत.-
