माहिती विभागाची कुंभकर्णी झोप..

0
805
खडसेंची मंत्रीपदावरून छुट्टी झालीय हे
माहिती आणि जनसंपर्कला माहितीच नाही
 
‘खानदेश रत्न'(?) एकनाथ खडसे यांची मंत्रीपदावरून छुट्टी होऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला असला तरी याची खबर माहिती आणि जनसंपर्क विभागाला नाही.कारण माहिती आणि जनसंपर्कच्या वेबसाईटवर आजही एकनाथराव आपले मंत्रीपद अबाधित टिकवून आहेत.माहिती आणि जनसंपर्क विभागाच्या वेबसाईटवर मंत्र्यांची नावे आणि पत्ते ज्या फोल्डरमध्ये आहेत तेथे महसुल आणि अन्य खातेधारी मंत्री म्हणून एकनाथ खडसे आजही विराजमान आहेत.सरकारच्या कामांना लोकांपर्यंत पोहोचविणे हे माहिती आणि जनसंपर्कचे काम आहे मात्र मंत्र्यांची अद्ययावत यादी देखील हा विभाग व्यवस्थित देऊ शकत नाही ही शोकांतिका आहे.आजपासून ब्रिजेशसिंग यांनी या विभागाचे महासंचालक म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत,पाहू यात या विभागात काही बदल होतो का ते …ब्रिजेशसिंग हे पोलिस अधिकारी आहेत.त्यामुळे ते शिस्तप्रिय असणार.बेशिस्त,आणि राजकारणग्रस्त झालेल्या माहिती आणि जनसंपर्कला शिस्त लावण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.या विभागाचा पत्रकार आणि पत्रकार संघटनांशी संपर्क पार तुटला आहे.काही ठराविक टगे बरोबर घेऊन दोन-चार अधिकारी हा विभाग हाकत आहेत.मराठी पत्रकार परिषदेने गुन्हेगारीवृत्तीच्या सदस्याची अधिस्वीकृतीवरील नियुक्ती रद्द करावी म्हणून दहा वेळा पत्रे दिली,प्रत्यक्ष भेटी घेतल्यातरी मनमानी पध्दतीनं त्यांना पाठिशी घाळण्याचा उपदव्याप काही अधिकारी ‘मान’भावीपणे करीत आहेत.त्यांच्या या मस्तवालपणाला चाप लावण्याचे आणि हा विभाग पत्रकाराभिमुख करण्याचे काम ब्रिजेशसिंग यांना करावे लागणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here