एक और झटका..

0
942
माहिती आणि जनसंपर्कमधील काही अधिकार्‍यांच्या उपद्व्यापांमुळे नेहमीच चर्चेत राहिलेल्या या   विभागाला आता आणखी एक तडाखा बसला असून ग्रंथोत्सव साजरा करण्याची या विभागाकडील जबाबदारी सास्कृतिक विभागाकडून काढून घेण्यात आली आहे.राज्यातील जिल्हा माहिती अधिकार्‍यामार्फत हे ग्रंथोत्सव साजरे केले जात होते.मात्र ग्रंथ चळवळीबद्दलची अनास्था,ढिसाळ नियोजन आणि एकूणच  निरूत्साहामुळे ग्रंथोत्सव साजरा करण्यामागचा सरकारचा उद्देश  साध्य होत नव्हता.त्यामुळे या विभागाकडील ही जबाबदारी काढून घेण्यात आली आहे.एक जबाबदारी कमी झाल्यामुळे भलेही काही अधिकारी  आनंदोत्सव साजरा करणार असले  तरी त्यामुळे या विभागाच्या कार्यक्षमतेवर नक्कीच प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.या बाबतची सविस्तर बातमी आज लोकमतने दिली आहे.
वाचन संस्कृती टिकावी,त्याचा प्रचार,प्रसार व्हावा यासाठी राज्य सरकारचे सांस्कृतिक धोरण 2010 नुसार राज्यातील प्रत्येक जिल्हयात ग्रंथोत्सव साजरा करण्याची कल्पना मांडली गेली.माहिती आणि जनसंपर्क विभाग ही चळवळ वृध्दींगत करण्यासाठी झटेल अशा अपेक्षेने त्याची जबाबदारी या विभागाकडे सोपविली गेली.मात्र या विभागाने पूर्ण भ्रमनिराश केल्याचे समोर आले आहे. जिल्हयाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी अध्यक्ष आणि माहिती  अधिकारी सचिव अशी ही रचना होती.मात्र नियोजनाची सर्व जबाबदारी जिल्हा माहिती अधिकार्‍यांचीच होती.असे असले तरी अनेक जिल्हयात ग्रंथोत्सवाचा बट्ट्याबोळ वाजल्याचे दिसून आले होते.काही जिल्हयात ग्रंथोत्सवाच्या निमित्तानं आर्थिक गैरव्यवहाराचीही चर्चा झाली आहे.ही वस्तुस्थिती ग्रंथालय संचालनालयाचे महासंचालक  किरण धांडोरे यांनी सास्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या निदर्शनास आणून दिली.त्यानंतर तावडे यांनी तातडीने निर्णय घेत माहिती आणि जनसंपर्क विभागाचा पत्ता कट करीत ग्रंथोत्सवाचे नियोजन जिल्हा ग्रंथालयाकडे सोपविले.ग्रंथोत्सवाची जी समिती आहे त्याचे अध्यक्ष जिल्हाधिकारीच राहणार असले तरी माहिती आणि जनसंपर्कचा यातील सहभाग केवळ समितीच्या सदस्यत्वापुरताच सीमित  असणार आहे. सरकारने केलेल्या कामाबद्दल जनतेला अवगत करण्याची जबाबदारी या विभागाला पेलवत नाहीच.त्यात आता वाचन संस्कृती वाढविण्याची महत्वाची जबाबदारीही या विभागाकडून काढून घेतली गेली आहे.याची खंत वरिष्ठ अधिकार्‍यांना वाटणार नसली तरी याची दबक्या आवाजात चर्चा विभागात सुरू झाली आहे.सास्कृतिक विभागाने माहिती आणि जनसंपर्ककडील जबाबदारी काढून घेतल्याने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील या विभागाला दिलेला हा तगडा फटका असल्याचे बोलले जात आहे.माहिती आणि जनसंपर्क मधील काही वरिष्ठ अधिकारी आपल्याला ठरवून दिलेले काम सोडून पत्रकार संघटनांच्या उचापती कऱण्यातच वेळ खर्ची घालत असल्याने त्यांचे या विभागाकडे लक्षच नाही अशी चर्चा गेली काही दिवस सुरू होती.सास्ृतिक विभागाने या चर्चेवर आता शिक्कामोर्तब केले असल्याने हा विभाग केवळ पांढरा हत्ती बनला आहे असे बोलले जाऊ लागले आहे.
राज्यात 12,500 ग्रंथालये असून वाचनांची आवड लोकांमध्ये निर्माण व्हावी यासाठी ही ग्रंथाल्ये काम करीत आहेत.ग्रंथोत्सवाचे आयोजन त्याच साठी केले जात होते.आता ही जबाबदारी जिल्हा ग्रंथालयावर सोपविल्याने त्याचा फायदा होणार आहे.ग्रंथोत्सव 16 साठी 52 लाख 50 हजारांचा निधी खर्च कऱण्यात येणार आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here