माध्यमांशी बोलायला बंदी

0
693
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (एनआयए) या तपास संस्थेने आपल्या सर्व अधिकार्‍यांना प्रसारमाध्यमांशी संवाद न साधण्याची सक्त ताकीद दिली आहे. 
संस्थेने आपल्या सनदेतील नियमांचे काटेकोर पालक करण्यासाठी अशा सूचना दिल्या असून एखादा अधिकारी नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. अद्याप तसे प्रकरण उघडकीस आलेले नाही. आम्ही प्रसारमाध्यमांशी प्रसिद्धीपत्रकांच्या माध्यमातून संपर्क साधू. एखाद्या बाबतीत तातडीने बोलायचे असल्यास मला ते अधिकार देण्यात आले आहेत, असे एनआयएचे पॉलिसी विषयाचे महानिरीक्षक पी. व्ही. रामशास्त्री यांनी सांगितले. ते संस्थेच्या दिल्लीतील मुख्यालयात असतात. संस्थेच्या मुंबईतील एका अधिकार्‍याने सांगितले की परिपत्रकात सर्वच अधिकार्‍यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. आम्हाला वाटते की कोणाचे माध्यमांच्या प्रतिनिधींशी संबंध आहेत का हे तपासण्यासाठी आमच्या फोनचे कॉल रेकॉर्ड्सही मागवले जातील. 
काही दिवसांपूर्वी इराकमधील आयएसआयएस या संघटनेने चालवलेल्या संघर्षात सहभागी होण्यासाठी कल्याणमधील काही युवक गेल्यासंबंधी बातम्या आल्या होत्या. त्या तपासासंदर्भातील काही बातम्यांत एनआयएच्या अधिकार्‍यांनी माहिती दिल्याचे नमूद करण्यात आले होते. वास्तविक या संदर्भातील तपास एनआयएकडे नाही तर दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) आहे. यापुढे अशी गफलत टाळण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. 
एनआयएकडे महाराष्ट्रातील मालेगाव बाँबस्फोट आणि लष्कर-ए-तय्यबाचा दहशतवादी अबू जिंदाल या प्रकरणांचा तपास सोपवलेला आहे.( लोकमतवरून साभार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here