माध्यमांना इशारा,जया टीव्हीच्या ऑफीसवर छापे

0
752

चेन्नई येथील जया टीव्हीच्या कार्यालयावर आज सकाळी आयकर विभागाच्या दहा अधिकार्‍यांनी छापे मारले आहेत.जया टीव्हीनं आपलं उत्पन्न लपविलं आणि करचुकवेगिरी केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई केली गेली असली तरी हा माध्यमांना दिलेला इशारा समजला जात आहे.यापुर्वी एका नॅशनल चॅनलवर अशाच पध्दतीची छापेमारी केली गेली होती.जया टीव्हीची मालकी सध्या तुरूंगात असलेल्या शशिकला यांच्या कुटुंबाकडं आहे.टीव्हीचे नेतृत्व सध्या शशिकला यांचा पुतण्या विवेक जयरामण करीत आहे.तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी ही वाहिनी सुरू केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here