पेन्शनमध्ये हवीय वाढ

0
710

माजी आमदारांना पेन्शनमध्ये हवीय
आणखी 20 हजारांची वाढ
विधानसभा अध्यक्षांक डे उद्या बैठक

महाराष्ट्रातील आमदारांच्या अवास्तव पेन्शनवाढीस विरोध कऱण्यासाठी मी आणि किरण नाईक यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी सुरू असतानाच आता पुन्हा एकदा माजी आमदारांनी पेन्शनमध्ये 20 हजार रूपयांची वाढ करावी अशी मागणी केली आहे.चाळीस हजारावरून ही पेन्शन आता साठ हजार करावी अशी या माजी आमदारांची मागणी आहे.दरवर्षी माजी आमदारांच्या पेन्शनमध्ये वाढ झाली पाहिजे असाही या माजीची आग्रह आहे.त्यासाठी त्यांनी विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेच्या सभापतींची नुकतीच भेट घेतली या संंदर्भात चर्चा कऱण्यासाठी उद्या दिनांक 21 रोजी विधानभवनात बैठकीचे आयोजन कऱण्यात आले आहे.या बैठकीत काय निर्णय़ होतो त्याकडे महाराष्ट्राचे लक्ष आहे.महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना,शेतकरी दारिद्‌÷याला कंटाळून आत्महत्या करीत असताना आणि महाराष्ट्राच्या डोक्यावर असलेल्या कर्जावरील या माजी आमदारांना आपल्या पेन्शनमध्ये आणखी 20 हजार रूपयांची वाढ हवी आहे हा महाराष्ट्रातील जनतेच्या जखमेवर मीठ चाळण्याचा प्रकार आहे.असा कोणताही प्रय़त्न जनतेने संघटीतपणे हाणून पाडायला हवा.माजी आमदारांची संघटना आहे.सुधाकर गणगणे हे या संघटनेचे अध्यक्ष आहेत.त्यांच्या पुढाकारानेच ही बैठक होत आहे.या बैठकीत न्यायालयात एस.एम.देशमुख यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर नेमकी काय भूमिका घ्यायची याबद्दलही चर्चा होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here