महिला पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर वाढत आहेत.महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसात पनवेल आणि पुणे येथील महिला पत्रकारांवर हल्ले झाले.आता दिल्लीहून एका महिला पत्रकारावर हल्ला झाल्याची बातमी आलीय.एका ऍटोरिक्षा चालकाने एका महिला पत्रकाराच्या कानशिलात लगावल्याची ही बातमी आहे.रिक्षाच्या झालेल्या किरायापेक्षा जास्तीचा किराया मागणाऱ्या रिक्षा चालकास विरोध केल्यानंतर रिक्षा चालकाने महिला पत्रकाराला थप्पड लगावली.महिलेच्या तक्रारीवरून पोलिसात गुन्हा दाखल झाला असून रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे.
फत्तेहपुर बेरी भागात राहणारी ही 27 वषीय महिला पत्रकार शनिवारी दुपारी छत्तरपूर मेट्रो स्टेशनसाठी निघाली होती.तेथून महिला पत्रकारास महरौली मार्केटकडं जायचं होतं.ती दिलशाह नावाच्या रिक्षा चालकालाकडं गेली मात्र एवढ्या कमी अंतरासाठी मी येणार नाही.त्यासाठी मिटर पेक्षा जास्तीचे भाडे द्यावे लागतील असं त्यानं सूचविलं.त्यावरून दोघात वाद सुरू झाला.ेेएवढ्यात रिक्षा चालकानं महिला पत्रकाराला थप्पड लगावली.ही मारहाण रेल्वेस्टेशनच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.मिटर प्रमाणेच भाडे देईल असा आग्रह धऱणा़ऱ्या महिला पत्रकारास झालेल्या मारहाणीबद्दल निषेध होत आङे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here