नांदेड ( प्रतिनिधी) येथील उच्चशिक्षित महिला पत्रकार मनीषा कुलकर्णी यांची साडेपंधरा लाख रूपयांची आर्थिक फसवणूक करून गेल्या पंधरा वर्षांपासून लैगिक शोषन केल्याप्रकरणी एका बाबांसह पाच जणांच्या विरोधात लिंबगाव पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे,
मनीषा कुलकर्णी यांना स्वतःचे वर्तमानपत्र सुरू करायचे होते.तो संकल्प पूर्ण करण्यासाठी त्या 2000मध्ये मल्लीनाथबाबांच्या संपर्कात आल्या. बाबांनी मनीषा कुलकर्णी यांना त्यांच्या भक्तांना साडेआठ लाख रूपये द्यायला लावले तसेच नवघरवाडी येथे सात लाख रूपये खर्च करून मनीषा कुलकर्णी यांनी मंदिर बांधून देण्यास लावले.अशी माहिती मनीषा कुलक र्णी यांनी रविवारी नांदेड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.