‘महाराष्ट्र माझा’ संकल्पनेवर आधारित छायाचित्र स्पर्धा

0
788

‘महाराष्ट्र माझा’ संकल्पनेवर आधारित छायाचित्र स्पर्धा

Ø  निवडक छायाचित्रांचे भरणार मंत्रालयात प्रदर्शन

Ø  पंधरा, दहा व पाच हजार रुपयांची पारितोषिके

Ø  एक हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षीसे

अलिबाग दि.31: महाराष्ट्राच्या प्रगतीचे सचित्र दर्शन घडावे यासाठी महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या विविध महत्वाच्या योजनांवर आधारित छायाचित्र स्पर्धेचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्राप्त छायाचित्रांपैकी दर्जेदार छायाचित्रांचे दि. 1 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर 2016 या कालावधीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.

या स्पर्धेत प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकासाठी निवड झालेल्या छायाचित्रांना अनुक्रमे 15 हजार रूपये, 10 हजार रूपये, 5 हजार रूपये पारितोषिक प्रदान केले जाणार असून एक हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ  बक्षीसे देण्यात येणार आहेत. सर्व सहभागी छायाचित्रकारांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

            ‘महाराष्ट्र माझा’ या संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राचा प्राचीन, ऐतिहासिक वारसा आणि शासनाच्या जलयुक्त शिवार, सेवा हमी कायदा,  मेक इन महाराष्ट्र, स्वच्छ महाराष्ट्र, स्मार्ट सिटी, कुशल महाराष्ट्र्, भाग्यश्री योजना, पर्यटन महाराष्ट्र, आपले सरकार आणि दोन कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम आदी योजनांशी संबंधित छायाचित्रे स्पर्धेसाठी पाठवता येतील. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणा-या छायाचित्रकारांनी हाय रिझॉल्युशन(एचडी) छायाचित्रे जिल्हा माहिती कार्यालय,पाध्येवाडी नवरे इमारत, बँक ऑफ इंडिया शाखेसमोर, ता.अलिबाग, जि.रायगड येथे पाठवावी अथवा dioraigad@gmail.com या ई मेल पत्यावर दिनांक 09 सप्टेंबर 2016 पर्यंत पाठवावीत.

राज्यभरातून प्राप्त दर्जेदार छायाचित्रांची प्रदर्शनासाठी निवड करण्यासाठी 5 तज्ज्ञांची समिती गठित केली असून समितीत ज्येष्ठ छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे, ज्येष्ठ पत्रकार आशुतोष पाटील यांच्यासह मान्यवरांचा समावेश आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून या स्पर्धेत जास्तीत जास्त छायाचित्रकारांनी सहभाग घ्यावा. त्यासाठीसमन्वयक वरिष्ठ  सहायक  संचालक  अजय  जाधव  (9702973946), (dloajayjadhav2012@gmail.com), सहायक   संचालक  सागरकुमार कांबळे (8605312555),(ksagar1983@gmail.com) यांच्याशी संपर्क साधावा.

000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here