महाड तालुक्यातील 21 गावांचे भूवैज्ञानिकांकडून सर्वेक्षण सुरू
महाड तालुक्यातील दरडी कोसळण्याचा धोका असलेलया 21 गावांचे जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या वतीने सर्वेक्षण सुरू झाले असून तालुक्यातील कोंडिवते गावाला भूवैज्ञानिकांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली.अन्य गावांचे सर्वेक्षण देखील लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली.डोंगर उतारावरील गावांत पडणार्या पावसाचे दररोज निरिक्षण सुरू असून गरज भासल्यास या गावांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनास देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
2005 मध्ये तालुक्यात मोठ्या प्रमाणात भुस्खलन झाले होते.तेव्हा देखील सर्वेक्षण केले गेले होते.त्यानंतर मंगळवारी मांगरूण- वारंगी मार्गावर मोठ्या प्रमाणातवर दरड कोसळल्याने प्रशासनाने फेर सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत.-