महाडः मृतांच्या नातेवाईकांनी आशा सोडल्या

0
771
महाडः मृतांच्या नातेवाईकांनी आशा सोडल्या,
दहाव्या दिवशी सामुहिक श्रध्दांजली 
सावित्रीच्या पुरात वाहून गेलेल्या दोन बसेस पैकी एका बसचा सांगाडा काल सापडला असला तरी जे बेपत्ता आहेत त्यांचा मात्र काही ठावठिकाणा किंवा मृतदेह अद्याप न मिळाल्याने जे बेपत्ता आहेत त्यांच्या नातेवाईकांनी आता  आशा सोडल्याचे दिसते.गेली दहा दिवस आपले नातेवाईक सापडतील किंवा त्यांचा मृतदेह तरी मिळतील अशी आशा घेऊन बसलेले नातेवाईकांनी आज दहाव्या दिवशी घरी परतण्याचा निर्णय घेतला असून आज सावित्रीच्या काठावर या नातेवाईकांनी आपल्या आप्तेष्ठांना सामुहिक श्रध्दांजली अर्पण करून रिक्त हस्तेच साश्रू नयनांनी परतीचा प्रवास सुरू केला आहे.दरम्यान आज दहाव्या दिवशीही शोध मोहिम सुरूच आहे.मात्र आज एकही मृतदेह मिळाला नसल्याचे शोध यंत्रणांनी स्पष्ट केले आहे.दुसर्‍या एस.टी.चा शोधही घेतला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here