महसूलमंत्री अति दक्ष..  अन

0
1041

काय रावसाहेब, मोबाईलवर 7/12 मिळतो का नाही? चक्क महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांनीच  भरसभेत पनवेलचे तहसीलदार पवन चांडक यांना प्रश्न विचारला. अगदी न डगमगता तहसीलदारांनीसुध्दा होयसाहेब ! असे उत्तर दिले आणि सभागृहात हास्यकल्लोळ झाला.

निमित्त होते पनवेल येथील तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपुजन समारंभाचे. आद्यक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह तुंडुंब भरलेले, कोकण म्हाडा अध्यक्ष माणिकराव जगताप,आ.प्रशांत ठाकुर सह विविध मान्यवर तर विभागीय आयुक्त राधेश्याम मोपलवार, जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांच्यासह मोठ्या उत्साहाने पनवेलकर मंत्रीमहोदयांचे विचार ऐकण्यास जमलेले, पनवेल महसूल प्रशासनानेम्हणजे प्रांत व तहसीलदार कार्यालयाने अत्यंत दिमाखदार असा हा समारंभ आयोजलेला आणि महसूलमंत्र्यांचे भाषण सुरु झाले.

            शांत, संयमी, गंभीर असे महसूलमंत्री त्या दिवशी खूपच प्रसन्न व काहीसे हलक्या-फुलक्या मुडमध्ये होते. महसूल विभागाच्या विविध लोकाभिमुख योजनांची माहिती देत होते. दाखले वाटप विषय निघालाआणि तलाठी तात्या, सर्कल आप्पा, भाऊसाहेब, रावसाहेब अशी महसूली टोपण नावे मंत्रीमहोदय घेऊ लागले. पश्चिम महाराष्ट्र, कोंकण, मराठवाडा या भागात तलाठी, तहसीलदार, प्रांत यांना अशी टोपण नावे असतात.मंत्रीमहोदयांनी ही नावे घेताच उपस्थितांत आणि स्टेजवरही प्रचंड हशा झाला.

शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यास शासकीय अधिकारी, कर्मचारी अशी मोठी यंत्रणा कार्यरत असते. समाजातील शेवटच्या घटकांपर्यत त्या योजना पोहचून त्याचा लाभ योग्य लाभार्थ्यापर्यंतपोहोचला की, ती योजना यशस्वी असे सर्वसाधारण सुत्र. मग खरोखरच शासकीय यंत्रणा सक्षम आहे का याची खात्री कधी कधी वरिष्ठ स्तरांवर केली जाते. परवा तर चक्क महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनीच अत्यंत दक्षराहून चक्क तहसीलदारांचीच साक्ष जनतेसमोर घेतली आणि उपस्थित जनतेला दिलासा दिला.

            महसूल विभागामार्फत घेण्यात आलेले लोकाभिमुख निर्णय लोंकापर्यंत पोहचवून त्याचा फायदा कसा होतो हे मंत्रीमहोदय सांगत होते. 7/12 चा विषय निघाला. आमचा तलाठी तात्या आता लॅपटॉप वापरूनतुम्हाला 7/12 देतो. अगदी मोबाईलवर देखील तुम्हाला त्याची माहिती मिळते. असे मंत्रीमहोदय म्हणाले आणि त्यांच्या बाजूस उभे असलेले पनवेलचे तहसीलदार पवन चांडक यांना काय रावसाहेब म्हणून विचारुनत्यांचीच साक्ष घेतली. तहसीलदार चांडक यांच्या हजरजबाबी उत्तराने मंत्रीमहोदय खुष झाले आणि लोकांना म्हणाले की, मला अडचण नाही पण उद्या तुम्हाला हे तहसीलदारच भेटणार आहे त्यामुळे त्यांचीच साक्ष तुम्हालादेतो. त्यानंतर मंत्री महोदयांनी महसूल विभागाच्या विविध योजना, दाखले पूर्वीपेक्षा किती सहज आणि सोप्या पध्दतीने लोकांना मिळतात याची माहिती देऊन प्रत्येक वेळी तहसीलदारांची साक्ष जनतेस दिली.

            सर्वसामान्य जनतेच्या बाबतीत त्यांना अगदी दैनंदिन जीवनातही उपयुक्त ठरणारे अथवा भविष्यात महत्वाचे असलेले दाखले देण्यासाठी, तहसीलदार ते महसूल मंत्री ही महसूल विभागाची भक्कम साखळीआहे. ज्यांच्या माध्यमातून राज्यातील अनेक लोकोपयोगी योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविल्या जातात. महसूल मंत्र्यांनी त्या दिवशी खूपच सहज आणि साध्या सोप्या शब्दात ही साखळी जनतेसमारे खुलीकेली आणि उपस्थितांची मन जिंकली.

            अशा प्रकारचे प्रसंग फार क्वचित येतात. काही दिवसांपूर्वी महसूलमंत्र्यांवर झालेल्या शाईफेकीच्या अप्रिय प्रकारानंतर महसूल मंत्र्यांच्या बाजूने उभारलेली राज्यातील महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांची संघटनाही महसूलमंत्र्यांची फार मोठी प्राप्ती आणि त्यांनी केलेल्या महसूल विभागातील सकारात्मक बदलाची पावती होती. त्याचाही काहीसा प्रत्यय त्या दिवशीच्या कार्यक्रमात आला.. .. ..

राजू पाटोदकर

जिल्हा माहिती अधिकारी

रायगड-अलिबाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here